(रत्नागिरी)
भारतीय रेल्वेने जुन्या गाड्यांच्या ठिकाणी एलएचवी तंत्रज्ञानाने बनवलेल्या नवीन गाड्या देशभरातील सर्वच रेल्वेमार्गावर चालवण्याचे धोरण अवलंबले आहे. त्यानुसार कोकण रेल्वेमार्गे धावणारी आणखी एक एक्स्प्रेस गाडी आता नव्या रंगरूपात एलएचबी रेकसह धावणार आहे.
कोकण रेल्वेमार्गे धावणारी पोरबंदर ते कोचुवेल्ली ही गाडी आतापर्यंत आयआरएस रेकसह धावत होती; मात्र आता ती नवीन एलएचबी तंत्रज्ञानाने बनवलेल्या कोचसह धावणार आहे. एलएचबी श्रेणीतील ही गाडी २८ मार्चपासून प्रत्यक्ष धावू लागेल. जुन्या आयआरएस रेक २३ डब्यांची होती; मात्र नव्या रंगरूपात रेकसह धावताना ती २२ डब्यांची होणार आहे.
डब्यांची रचना नव्या रंगरूपातील गाडीला टायरचे २, वातानुकूलित श्री टायरचे ६, स्लीपर जनरलचे तीन, एक पॅन्ट्री कार व एसएलआरचा डबा व जनरेटर कारप्रमाणे डबे असतील.