(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर येथील सोनवी नदीपात्रालगत असलेल्या पावटा मैदानात सुमारे 40 ते 45 वय वर्ष असलेल्या पुरुषाचा बेवारस मृतदेह आढळून आला असून संगमेश्वर पोलिसांना अद्याप त्याची कोणतीही माहिती मिळू शकलेली नसल्याने मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी कोणालाही काही माहिती असल्यास पोलिसांकडे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संगमेश्वर येथील पावटा मैदानात 17 मार्च रोजी एका 40 ते 45 वय असलेल्या पुरुष व्यक्तीचा बेवारस मृतदेह आढळून आला आहे. गोल चेहरा, रंग सावळा, काळे पांढरे केस, पुढील भाग टक्कल, काळी पांढरी दाढी असा मृत व्यक्तीचा वर्ण असून अंगात निळा पंधरा चौकडीचा फुल बाह्याचा शर्ट तर नेसणीत काळ्या रंगाची फुल पॅन्ट आहे.
सदर मृत व्यक्तीची ओळख पाठविण्यासाठी संगमेश्वर पोलिसांना कोणतीच माहिती मिळालेली नसल्याने कोणाला बेवारस आढळून आलेल्या मृत व्यक्ती संदर्भात माहिती असल्यास संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपअधीक्षक शिवप्रसाद पारवे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९४२९३९६२३२, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत शिंदे यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९४०५१०७२३६, संगमेश्वर पोलीस ठाणे दूरध्वनी क्रमांक ०२३७४-२७२०३३ यांच्याकडे संपर्क करून माहिती कळविण्याचे आवाहन संगमेश्वर पोलिसांनी केले आहे.