( रत्नागिरी /प्रतिनिधी )
खडपोली एमआयडीसीमधील कृष्णा अँटीऑक्सिडंट्स प्रा. लि. या कंपनीमध्ये वन महोत्सव निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. वन अधिकारी, फॅक्टरी हेड टी. रहमान व श्री. अशोक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली जारुळ, निव, वड, पिंपळ, हेळा आदी 500 झाडांची लागवड करण्यात आली. या शिवाय कंपनी कडून सन 2017 पासून देशी 1000 झाडे लागवड करण्यात आली असून ती जतन करून त्यांचे संरक्षण, संवर्धन केले जात आहेत.
सदर वेळी विभागीय वन अधिकारी रत्नागिरी (चिपळूण )गिरिजा देसाई, सहायक वन संरक्षक वैभव बोराटे चिपळूण, वन पाल रामदास खोत, वन रक्षक सिद्धेश्वर गायकवाड, व विशाल पाटील तसेच कंपनीचे युनिट हेड शंतनु मलिक, एच. आर. सुयोग चव्हाण, सुरक्षा अधिकारी सिद्धेश मुळे, नागानंदा, डॉक्टर संजय जाधव, अभय शेरेकर, दत्तप्रसाद हातीसकर, सौरभ लकेश्री, संजय मनवळ, संजय जाधव, महेश शिंदे, इत्यादी अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना गिरीजा देसाई यांनी रत्नागिरी जिल्हा हा पर्यावरण पूरक असून येथे गडकिल्ले, वन्यप्राणी, पशुपक्षीच्या विविध जाती आढळून येतात. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा जिल्हा नैसर्गिक साधनसंपत्तीने परिपूर्ण आहे. या भागात भारतीय प्रजातीची वृक्षलागवड व विविध स्वयंसेवी संस्था, शाळा महाविद्यालये, सरकारी निमसरकारी कार्यालये, NGO, कंपनीना, प्रोत्साहन देणेकरिता वनविभागामार्फत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड मोहीम हाती घेण्यात यावी या करिता सवलतीच्या दरात देशी रोपे उपलब्ध करून देणेत येतील असे आवाहन वन अधिकारी यांचे मार्फत करणेत आले. कंपनीमार्फत विभागीय वन अधिकारी गिरीजा देसाई व सहाय्यक वन संवरक्षक वैभव बोराटे व अधिकारी वर्ग हे वृक्षारोपण व मार्गदर्शन करण्याकरीता कंपनीमध्ये उपस्थित राहिल्याबद्दल कंपनी मार्फत त्यांचे स्वागत करण्यात आले.