(महाड)
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड जवळ सोमवारी सायंकाळी एका वृध्द इसमाला रस्ता ओलांडताना टॅंकरची धडक लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली मात्र महामार्गावर पादचार्यांसाठी उभारण्यात आलेले स्कायवॉक केवळ स्मारक म्हणून असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा उघड झाले आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर महाड जवळ सायंकाळी ५:०० च्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय चांभारखिंड येथे महामार्ग ओलांडून जात असताना किसन लक्ष्मण मोरे वय ७० यांना मुंबई कडून येणारा टॅंकर क्रमांक एमएच ४३ बी एक्स ०८३८ ची धडक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी महाड शहर पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे.