(डिजिटल टेक्नॉलॉजी)
पर्मनंट अकाऊंट नंबर अर्थात PAN एक महत्वाचं डॉक्युमेंट आहे जे आर्थिक व्यवहारांमध्ये खूप उपयुक्त ठरतं. याचा वापर ओळखपत्र म्हणून देखील करता येतो. त्यामुळे यावरील माहिती अचूक असणं आवश्यक आहे. पॅन कार्डवरील फोटो आणि सही महत्वाची असते. कारण लोन, क्रेडिट कार्ड, इन्व्हेस्टमेंटच्या व्हेरिफिकेशनसाठी या दोन गोष्टींकडेच लक्ष दिलं जातं. त्यामुळे जर तुमच्या पॅन कार्डवर चुकीची सही किंवा फोटो असेल तर तो आत्ताच बदलून घ्या नाही तर पुढे अडचण वाढू शकते. PAN Card वरील फोटो आणि सही बदलण्यासाठी पुढील पद्धत फोलो करा.
PAN Card वरील फोटो आणि सही अशी बदला
- सर्वप्रथम NSDL च्या अधिकृत वेबसाईटवर जा https://www.onlineservices.nsdl.com/paam/endUserRegisterContact.html
- फॉर्ममध्ये अॅप्लिकेशन टाइपमध्ये “Changes or Correction in existing PAN data” ची निवड करा.
- कॅटेगरीच्या जागी “Individual” ची निवड करा.
- समोर आलेल्या फॉर्मवर अर्जदाराची संपूर्ण माहिती भरा आणि सबमिटवर क्लिक करा.
- समोर आलेला टोकन नंबर नोट करून ठेवा आणि पुढे कंटिन्यू करा.
- तुमची केवायसी कशी करायची याची निवड करा.
- आधार किंवा EID आणि इतर आवश्यक माहिती भरा.
- त्यानंतर “Photo Mismatch” आणि “Signature Mismatch” वर टिक करा.
- वडील किंवा आईची माहिती द्या आणि नेक्स्ट वर क्लिक करा.
- “Address and Contact” सेक्शनमध्ये तुमचा पत्ता आणि इतर माहिती द्या.
- ओळखीचा, निवासाचा आणि जन्मतारखेचा पुरावा द्या.
- जर तुम्ही आधार कार्ड दिलं तर एकाच डॉक्युमेंटमध्ये काम होईल. तसेच तुम्हाला पॅनची किंवा पॅन अलॉटमेंट लेटरची कॉपी देखील सबमिट करावी लागेल.
- डिक्लेरेशनवर टिक करून तुमची माहिती सबमिट करा.
- तुमच्या डॉक्युमेंट्सची स्कॅन कॉपी व्हेरिफिकेशनसाठी अपलोड करा.
- सबमिटवर क्लिक करण्यापूर्वी एकदा सर्व माहिती तपासून घ्या.
- आता तुम्हाला 110 रुपयांचं पेमेंट करावं लागेल.
- अर्ज सेव्ह करा आणि त्याची प्रिंट आऊट घ्या.
- आता हा अर्ज NSDL च्या ‘INCOME TAX PAN SERVICES UNIT at 5th Floor Mantri Sterlin’g, Plot No. 341, Survey No. 997/8, Model Colony, Near Deep Bungalow Chowk, Pune-411 016’ या पत्त्यावर तुमच्या डॉक्युमेंटसह पाठवून द्या.
- तुम्हाला 15 अंकी अॅक्नॉलेजमेंट नंबर मिळेल ज्याच्या मदतीनं तुम्ही स्टेट्स चेक करू शकता.