(संगमेश्वर / प्रतिनिधी)
व्यापारी पैसा फंड संस्था संगमेश्वर संचलित, पैसा फंड इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. प्रांजल प्रमोद गुरव ( इ. १० वी ) हिने तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
अखिल भारतीय विज्ञान मेळावा २०२४ आयोजित या तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत कृत्रिम बुद्धिमत्ता, संभाव्यता आणि आव्हाने हा विषय देण्यात आला होता. प्रत्येक प्रत्येक स्पर्धकाला आठ मिनिटे वेळ देण्यात आला होता. सदर स्पर्धा न्यू इंग्लिश स्कूल देवरुख येथे संपन्न झाली. प्रांजल गुरव हिने, आजच्या युगात मानव हा सर्व बाबतीत रोबोट म्हणजे यंत्रमानवावर अवलंबून असतो. त्यामुळे होणारे फायदे व तोटे त्याचबरोबर आपण त्यांचा वापर मर्यादित का करायला हवा ? या विषयावर आपले मत मांडले. प्रांजलचे प्रभावी वक्तृत्व, विषयाला धरून मांडणी, उत्तम सादरीकरण यामुळे तिने या स्पर्धेत प्रथम क्रमांक प्राप्त केला.
प्रांजल हिने यापूर्वी तालुका आणि जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत आठ वेळा पारितोषिके प्राप्त केली आहेत. प्रांजल प्रमोद गुरव हिच्या या उज्वल यशाबद्दल तिचे आणि मार्गदर्शक शिक्षिका अर्चिता कोकाटे यांचे संस्थाध्यक्ष अनिल शेट्ये, उपाध्यक्ष किशोर पाथरे , सचिव धनंजय शेट्ये, सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर, पर्यवेक्षक दिलीप मोरगे आदींनी अभिनंदन केले आहे.
फोटो : कु. प्रांजल प्रमोद गुरव