( संगमेश्वर / प्रतिनिधी )
शिक्षण विभागातर्फे दरवर्षी घेतली जाणारी राज्यस्तरीय बालचित्रकला स्पर्धा यावर्षी १३ ऑगस्ट रोजी राज्यभर आयोजित करण्यात आली होती . व्यापारी पैसा फंड संस्थेचे पैसा फंड इंग्लिश स्कूल दरवर्षी या स्पर्धेत उत्सफुर्तपणे सहभाग नोंदवते . यावर्षी प्रशालेतील एकूण ३६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला .
बालचित्रकला स्पर्धेचे महत्व प्रशालेच्या कला विभागातर्फे विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्यानंतर ३६ विद्यार्थी उत्सफुर्तपणे या स्पर्धेत सहभागी झाले . या स्पर्धेत तालुका , जिल्हा , राज्य स्तरावर विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात येतात . या स्पर्धेसाठी प्रत्येक विद्यार्थ्यासाठी असणारी पाच रुपये प्रवेश फी विद्यार्थ्यांकडून न घेता प्रशालेच्या कला विभागातर्फे भरण्यात आली . याच बरोबर विद्यार्थ्यांना कला विभागाच्या वातीने प्रत्येकी एक बिस्कीट पुडा देखील खाऊ म्हणून देण्यात आला.चित्र काढण्यासाठी दोन तासांचा वेळ देण्यात आला होता . विद्यार्थ्यांनी आपल्या आकलनानुसार विषयाची निवड करुन उत्कृष्ट कलाकृती रेखाटून बाल चित्रकला स्पर्धेचा खराखुरा आनंद लुटला . स्पर्धेसाठी दिलेल्या विषयाचे चित्र आधी आपल्या मनात तयार करुन नंतर ते कागदावर रेखाटून रंगवताना पैसा फंडचे बालकलाकार आपले देहभान विसरुन गेले .
पैसा फंडच्या कला विभागातर्फे कला विषयक विविध उपक्रम राबविले जातात . सध्या शासकीय रेखाकला परीक्षेचे जादा तास , हर घर तिरंगा मोहिमेंतर्गत होणाऱ्या विविध स्पर्धा , स्वातंत्र्य दिनाची पूर्व तयारी अशा सर्व उपक्रमातून प्रशालेतील ३६ विद्यार्थ्यांनी बालचित्रकला स्पर्धेसाठी आपला उत्सफुर्त सहभाग नोंदवल्याबद्दल व्यापारी पैसा फंड संस्थेचे अध्यक्ष अनिल शेट्ये , उपाध्यक्ष किशोर पाथरे सचिव धनंजय शेट्ये ,सदस्य संदीप सुर्वे, रमेश झगडे, मुख्याध्यापक सचिनदेव खामकर , पर्यवेक्षक दिलीप मोरगे यांनी या बालकरांचे कौतूक आणि अभिनंदन केले आहे .