(रत्नागिरी)
श्री विश्वकर्मा पांचाळ ज्ञाती समाजातील श्री.विजयानंद निवेंडकर, कुलदीप वाडकर, पंकज नेवरेकर आदी हौशी होतकरू तरूणांच्या संकल्पनेतून श्री विश्वकर्मा चॅम्पियन ट्राॅफीचे स्पर्धा पर्व 1 नावाने रत्नागिरी शहरातील प्रमोद महाजन क्रिडा संकुल मैदानावर दिनांक 4 व 5 जानेवारी 2025 असे दोन दिवस क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांसाठी रत्नागिरी, रायगड जिल्ह्यासह मुंबई व पुणे शहरातून मिळून नऊ संघानी सहभाग घेतला होता.
स्पर्धेच्या वेळी प्रथम श्री प्रभु विश्वकर्माचे पूजन शहरातील हरहुन्नरी व्यक्तिमत्व श्री. सौरभ मलुष्टे यांचे हस्ते करण्यात आले. स्पर्धेदरम्यान रत्नागिरी शहरातील श्रीराम मंदीर देवस्थान विश्वस्थ, कमिटी सदस्य आणि ज्येष्ठ कर्मचारी नेते श्री. सुधाकरराव सावंत यांनी खेळाडूंचे कौतुक व अभिनंदन केले. रत्नागिरी पोलीस ठाण्याचे माजी पोलीस इन्स्पेक्टर व सध्या अलिबाग (रायगड) पोलीस ठाणे येथे कार्यरत असलेले श्री. झावरे यावेळी यांनी मोबाइलद्वारे संदेश पाठवून क्रिकेट स्पर्धा खेळाडूना शुभेच्छा दिल्या. तर मुंबईस्थित श्री. स्वप्निल प्रभाकर निवेंडकर यांनी स्पर्धेला हजेरी लावून स्पर्धेचे थेट यूट्यूबद्वारे प्रक्षेपण करण्याची व्यवस्था करून सर्वांना घरबसल्याही स्पर्धा पाहण्याची संधी दिली.
निढळेवाडी (संगमेश्वर ) येथील श्री. चंद्रकांत शि. वाडकर यांनी स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघासाठी जाहीर केलेला चषक अंजनवेल (गुहागर) येथील मार्टिअल ए संघाने जिंकला. तर गावदेवी त्रिमुख -भराडीन संघ निढळेवाडी यानी उपविजेतेपदाचा चषक मिळवला. उत्कृष्ट फलंदाज कु. यश वाडकर, उत्कृष्ट गोलंदाज विघ्नेश वाड्ये, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण कु. सौरभ वाड्ये तर मालिकावीर कु. वेदांत नेवरेकर ठरला. तर अंतिम सामनावीर कु. सागर किल्लेकर ठरला.
बक्षिस वितरणानंतर सर्व देणगीदार व हितचिंतकांचे श्री. विजयानंद निवेंडकर यानी आभार मानले. संपूर्ण स्पर्धा अत्यंत खेळीेमिळीच्या वातावरणात पार पडल्या. स्पर्धेच्या उत्कृष्ठ नियोजनाबाबत खेळाडू व प्रेक्षकांनी आयोजकांचे आभार मानले.