(मकरंद सुर्वे / संगमेश्वर)
संगमेश्वर जवळच्या धामणी येथे प्रभाकर बाबुराव घाणेकर यांच्या निवासस्थानी (हॉटेल श्रद्धा समोर) श्री स्वामी समर्थ पालखी दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
श्री स्वामी समर्थ भक्त प्रभाकर घाणेकर हे दरवर्षी श्री स्वामी समर्थ पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करतात. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. स्वामी भक्तांना अक्कलकोट या ठिकाणी जाऊन दर्शन घेणे शक्य नसते. त्यांच्यासाठी दरवर्षी धामणी येथे श्री स्वामी समर्थ पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. याही वर्षी मोठ्या उत्साहात पालखीचे आयोजन करण्यात आले होते
अनेक भक्तगणांनी या पालखी सोहळ्याचा आनंद घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला व पालखी श्रद्धा हॉटेल समोर श्री समर्थांच्या आवडत्या घोड्याच्या स्मारकाला दर्शन घेऊन स्वामींची पालखी पुढील सावर्डे येथे मार्गस्थ झाली.