(गुहागर / रामदास धो. गमरे)
बौद्धजन सहकारी संघ, गिमवी विभाग क्र. ३, विभागीय मध्यवर्ती महिला मंडळ, शाखा क्र. ३१ (गाव व मुंबई), रमाई महिला मंडळ, कळसूर, कौंढर, ता. गुहागर, जिल्हा रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ, माता सावित्रीबाई फुले, त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर या महामातांचा संयुक्त जयंती महोत्सव प्रियांका दिलीप मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली धम्मगिरी बुद्धविहार, कळसूर, कौंढर येथे रविवार, दि. ०९ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ठीक १०:०० ते सायंकाळी ५:०० या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. सदर प्रसंगी धार्मिक पूजापाठ चंद्रकांत गमरे (चिखली) यांच्या मधुरवाणीने संपन्न होईल. सुत्रसंचालनाची धुरा हर्षा गमरे, दीपाली गमरे या सांभाळणार आहेत. तर पाहुण्यांचे स्वागत चंद्रकला जाधव या करणार आहेत.
दुसऱ्या सत्रात सभा अध्यक्ष पद विभागाचे विभाग अध्यक्ष राजू मोहिते भूषवतील तसेच बौद्धजन सहकारी संघाचे विश्वस्त श्रीपाद गमरे, कार्याध्यक्ष दीपक मोहिते, माजी अध्यक्ष सुनील जाधव, उपचिटणीस दिलीप मोहिते, माजी चिटणीस महेंद्र मोहिते, सदस्य संदेश जाधव, मनोज गमरे, विनिता सुर्वे, विभाग अधिकारी सुनील पवार, अध्यक्ष शशिकांत सुर्वे, अनिल जाधव, सरपंच अनिषा गमरे, उपाध्यक्ष जगदीश मोहिते, सरचिटणीस निलेश गमरे, दर्शन गमरे, महेंद्र गमरे, सचिन गमरे, सुभाष पवार, दिलीप सुर्वे, विष्णू सावंत, वैष्णवी जाधव, प्रियांका मोहिते, श्वेता सुर्वे, आशा कांबळे, सारिका मोहिते, प्रणिता जाधव, सानिका गमरे, विभागीय महिला मंडळ, विभागीय कार्यकारिणी मंडळ (गाव व मुंबई) आदी मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी गिमवी विभाग क्र.३ च्या संलग्न सर्व शाखा, शाखांचे पदाधिकारी, सदस्य, सभासद, बौद्धाचार्य, महिला मंडळ यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन विभागाचे सरचिटणीस निलेश गमरे यांनी विभागाच्या वतीने काढण्यात आलेल्या परिपत्रकात नमूद केले आहे.