(रत्नागिरी)
कविकुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रत्नागिरी उपकेंद्र आणि गोगटे जोगळेकर महाविद्यालय, संस्कृत विभाग यांच्या सहयोगाने, भारतीय भाषा समितीच्या आर्थिक साहाय्याने खास रत्नागिरीकरांसाठी जगद्गुरु शंकराचार्य यांच्या विचारांवर आधारित एकदिवसीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. हे चर्चासत्र शुक्रवार दि २९ मार्च २०२४ रोजी शहरातील कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाच्या रत्नागिरी उपकेंद्रात सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आलेले आहे.
विशेष बाब म्हणजे हे चर्चासत्र सर्वांसाठी निःशुल्क असून केवळ नावनोंदणी करणे आवश्यक आहे. चर्चासत्राच्या दिवशी कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्वांसाठी उपाहार,मध्यान्ह भोजनाची आणि चहापानाची व्यवस्था करण्यात येणार आहे. शिवाय चर्चासत्रात सहभागी व्यक्तींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
नाव नोंदणी साठी कश्मिरा दळी ( 9028494199) आणि अविनाश चव्हाण (83908 54926) यांच्याशी संपर्क साधावा.
जगद्गुरु श्री शंकराचार्य हे सनातन संस्कृती आणि संपूर्ण भारत वर्षासाठी पूज्य स्थानी आहेत. भारताची भौगोलिक ,सांस्कृतिक आणि आध्यात्मिक क्षेत्रातील एकता आणि अखंडता कायमस्वरूपी दृढ करण्याकरिता जगद्गुरु श्री शंकराचार्यांनी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं. भारताच्या एकात्मतेसाठी जगद्गुरु श्री शंकराचार्य यांचे योगदान हे अमूल्य आहे. या सगळ्या गोष्टींवर या चर्चासत्राच्या माध्यमातून प्रकाश टाकला जाणार आहे. त्यामुळे रत्नागिरीकरांनी या चर्चासत्रात सहभागी होऊन जगद्गुरु श्री शंकराचार्य यांच्या कार्याचा आणि त्यांच्या योगदानाचा “याचि देहि, याचि डोळा” अनुभव घ्यावा असे आवाहन रत्नागिरी उपकेंद्राच्या वतीने करण्यात आलेले आहे.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1