(कळझोंडी / किशोर पवार)
तालुक्यातील कळझोंडी बौद्धजन पंचायत समिती स्थानिक व मुंबई तसेच आदर्श महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि. १२ ऑक्टोबर २०२४ रोजी ६८ वा धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन पंचशील बुद्ध विहार येथे करण्यात आले आहे.
सकाळी १०:३० वा. धम्म व पक्ष ध्वज फडकविण्यात येणार आहे.सदर कार्यक्रम बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ११ चे विद्यमान अध्यक्ष -आयु.अनिल पवार गुरूजी व आदर्श महिला मंडळाच्या अध्यक्षा नलिनी पवार यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर मान्यवर सर्व पदाधिकारी यांचे हस्ते भगवान गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, म.फुले, सावित्रीबाई फुले, शाहू महाराज, शिवाजी महाराज, आदी क्रांतिकारक महापुरुष यांच्या प्रतिमांना मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून दीप प्रज्वलित करण्यात येणार आहे. तद्नंतर महिला बौध्दाचार्य- आयु.प्रिशा प्रशांत पवार, संघमित्रा दिनेश पवार, सुप्रिया सुभाष पवार यांचे नेतृत्वाखाली धार्मिक बुद्ध पूजापाठ घेण्यात येणार आहे. त्यानंतर मान्यवर पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात येणार आहे.
सदरचा संपूर्ण कार्यक्रम माजी शिक्षण विस्तार अधिकारी व स्थानिक कमिटीचे चेअरमन अनिल पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी प्रमुख वक्ते जाकादेवी हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक तसेच वृत्त संकलक आयु.संतोष हे धम्म चक्र प्रवर्तन दिनानिमित्त मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष आयु.प्रकाश रा.पवार, शाखा कळझोंडीचे उपाध्यक्ष संदीप पवार, सेक्रेटरी सुभाष पवार, सहकार्यवाह प्रबोध पवार, सभापती प्रकाश भा.पवार, ऑडिटर -संगम पवार, खजिनदार प्रविण पवार, सल्लागार -किशोर पवार त्याचबरोबर आदर्श महिला मंडळाच्या अध्यक्षा -नलिनी पवार, उपाध्यक्षा-संपदा पवार, सचिव -रिना पवार, सहकार्यवाह -करुणा किशोर पवार, खजिनदार नंदिनी नि.पवार, सभापती – नम्रता सि.पवार, सल्लागार मयुरी वि.पवार आदी मान्यवर पदाधिकारी, शाखेतील सर्व धम्म बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित रहाणार आहेत.
याच कार्यक्रमात धार्मिक, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे.अभिवादन सभेनंतर याचवेळी भीम बुद्ध गीतांचा बहारदार कार्यक्रम सादर केला जाणार आहे. तरी समस्त बौद्धजन पंचायत समिती कळझोंडी शाखेतील सर्व धम्म बंधू भगिनींनी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन शाखेतर्फे करण्यात आले आहे.