(रत्नागिरी / वार्ताहर)
स्विफ्ट प्लेअर्स डान्स इन्स्टिट्यूट ही १५ वर्षे जुनी नावाजलेली संस्था असून संस्थेला मुंबई व सभोवतालच्या शहरांमध्ये प्रदिर्घ कामाचा अनुभव आहे. स्विफ्ट प्लेअर्स डान्स इन्स्टिट्यूटने 20 हून अधिक स्पर्धा आणि रिअॅलिटी शो जिंकले असून १०० हून अधिक कार्यक्रमांमध्ये सादरीकरण केले आहे. तसेच या अकॅडमीमध्ये ५ वर्षांपेक्षा जास्त कौशल्यपूर्ण अनुभव असलेले प्रमाणपत्रधारक प्रशिक्षक आहेत. नृत्य विषयातील अभ्यासक्रमावर आधारित शिक्षणासाठी, व्यक्तिमत्व आणि सामाजिक कौशल्य सुधारण्यासाठी “स्विफ्ट प्लेअर्स” हे एक अनुभवी व विश्वासार्ह व्यासपीठ आहे.
हिप-हॉप व भारतीय लोकनृत्यशैली दालखाई या दोन प्रकारच्या नृत्यशैली सदर शिबिरात शिकवल्या जाणार आहेत. १८ एप्रिल पासून रत्नागिरीत चालू असलेल्या स्विफ्ट प्लेअर्स डान्स इन्स्टिट्यूटच्या नृत्य शिबिरास भरघोस असा प्रतिसाद मिळाला असून रत्नागिरीकरांच्या आग्रहास्तव पुन्हा अजून एक नृत्याचे शिबिर आयोजित केले जात आहे. नृत्याची आवड असणाऱ्या सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्था संचालक पल्लवी आनंद आणि आनंद हरिदास यांनी केले आहे.
या शिबिराचा कालावधी १० दिवस दररोज अडीच तासांचा असून सदर कोर्समध्ये हिप-हॉप आणि भारतीय लोकशैली अशा दोन नृत्यशैली शिकवल्या जाणार आहेत. दररोजच्या वेळापत्रकात अर्धा तास व्यायाम आणि दोन्ही नृत्यांचा एक-एक तास सराव असे याचे नियोजन असणार आहे. तर शेवटच्या दिवशी पालकांसाठी प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे.
बुधवार दि. १ मे ते शुक्रवार दि. १० मे २०२४ या कालावधीत हे शिबिर मराठा मंदिर ग्लोबल स्कूल, जुना माळनाका, एम. एम. ए.के. देसाई हायस्कूलच्या मागे, मराठा मंदिर शैक्षणिक परिसर, रत्नागिरी येथे संपन्न होणार आहे. या शिबिरात भाग घेण्यासाठी ७५०६३८१८८४ /८७७९७७६९४७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.