(मुंबई)
अभियांत्रिकी प्रवेशासाठी आजपासून म्हणजे ९ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान उमेदवारांना कॅप राउंड १ साठी ऑप्शन फार्म भरता येईल. तसेच एमबीए प्रवेशाचे देखीव वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. एमबीए प्रवेशासाठी उमेदवारांना १० ऑगस्टपासून आपले ऑप्शन फाॅर्म भरता येणार आहेत.
अभियांत्रिकी प्रवेशासाठी (Engineering Admission Process) मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांना आजपासून ऑप्शन फाॅर्म भरता येणार आहेत. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा (State Common Entrance Test) कक्षाकडून प्रवेश फेरीचे वेळापत्रक प्रसिद्ध केले असून त्यानुसार आजपासून म्हणजे ९ ऑगस्ट ते ११ ऑगस्ट दरम्यान उमेदवारांना कॅप राउंड १ साठी ऑप्शन फार्म भरता येईल. तसेच एमबीएच्या प्रवेशासाठी कॅप राउंडचे ऑप्शन फॉर्म १० ऑगस्टपासून सुरू होतील. जागांचे पहिले वाटप १३ ऑगस्टला होणार आहे. पहिल्या फेरीत जागा रिक्त राहिल्यास दुसऱ्या फेरीची प्रक्रिया २० ऑगस्टनंतर सुरू होईल. म्हणजे तिसरी फेरी सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल.
इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेशाच्या दोन फेऱ्या ऑगस्टमध्ये होत होत्या, मात्र यावेळी ही प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. अभियांत्रिकीसोबतच एमबीए प्रवेशासाठी पहिल्या कॅप फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे १० ऑगस्टपासून सुरू होईल. ही प्रक्रिया १२ ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. तर जागांचे वाटप १५ तारखेला होणार आहे. १६ ते १८ ऑगस्ट या कालावधीत तुम्हाला कॉलेजमध्ये रिपोर्ट करावे लागेल. तसेच एमसीएचे ऑप्शन फॉर्म ९ तारखेपासून पासून भरले जातील. प्रवेश निश्चित करण्यासाठी तुम्हाला १४ ते १७ ऑगस्ट या कालावधीत महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल.
त्याचप्रमाणे एमसीएचे ऑप्शन फॉर्म ९ पासून भरले जातील. प्रवेश निश्चित करण्यासाठी तुम्हाला १४ ते १७ ऑगस्ट या कालावधीत महाविद्यालयांत जाऊन प्रवेश निश्चित करावा लागेल. एमटेकसाठी ऑप्शन फॉर्म ८ ऑगस्टपासून भरले सुरु आहेत. १२ ऑगस्ट रोजी पहिले वाटप होईल. त्याचबरोबर १३ ऑगस्टपासून महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. प्रवेश प्रक्रियेला झालेल्या विलंबामुळे विद्यापीठाच्या पहिल्या सत्राच्या परीक्षांनाही विलंब होणार आहे.