(रत्नागिरी)
युवा विधानसभेच्या माध्यमातून भविष्यातमहाविद्यालयीन विद्यार्थ्यांमधूनच एक चांगले नेत्तृत्व तयार होऊ शकते. त्यासाठीयुवा विधानसभा हे एक उत्तम व्यासपीठ आहे. अशाउपक्रमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास घडून येत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनात विविध संधींचा लाभ घेतला पाहिजे, असे मत गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी येथे व्यक्त केले. विद्यार्थी युवकांना संसदीय आणि विधिमंडळीय कामकाजाची ओळख व्हावी, त्यांच्यातील वादविवाद, वक्तृत्व आणि नेतृत्व कौशल्य विकसित व्हावे, या हेतूने र. ए. सोसायटीच्या कार्याध्यक्षा श्रीम. शिल्पाताई पटवर्धन आणि कार्यवाह श्री. सतीश शेवडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात गेल्या दोन वर्षापासून युवा विधानसभा कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाचा तिसरा युवा विधानसभा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर बोलत होते.
गोगटे जोगळेकर महाविद्यालयाला गतवर्षी प्रधानमंत्री राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान (पीएम-उषा) अंतर्गत अनुदान प्राप्त झाले. याअंतर्गत विद्यार्थ्यांसाठीविविध विभागांच्या वतीने प्रमाणपत्र, कौशल्य विकसन आणि व्यावसायिक कौशल्यावर आधारित अभ्यासवर्गांचे आयोजन करण्यात आले होते. राज्यशास्त्र विभागाच्यावतीने ‘Online Leadership Program for Parliamentary Affairs’ हा अभ्यासवर्ग घेण्यात आला. सैद्धांतिक अध्ययनाबरोबरच प्रात्यक्षिक ज्ञान या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्राप्त झाले. या अभ्यासवर्गात कीर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. हर्षद भोसले, डॉ. संगमेश्वर नीला, पत्रकार श्री. शिरीष दामले, डॉ. रविदास गावित, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी कु. प्रिया पेडणेकर, कु. वंशिता भाटकर यांनी साधनव्यक्ती म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्राचार्य डॉ. साखळकर पुढे म्हणाले, महाविद्यालयात जेविविधउपक्रम राबविले जातात, त्यापैकी युवा विधानसभा हा एक चांगला उपक्रम असून, त्याद्वारे आपल्याला संसदीय आणि विधीमंडळीय कामकाजाची माहिती, कामकाजातील संकेत नाट्यात्मक स्वरुपात पाहायला मिळाले. लोकशाहीत जनतेचा सक्रीय सहभाग महत्वाचा असणे हे सक्षम लोकशाहीचे एक लक्षण असते, असे ते पुढे म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकपर मनोगतात कला शाखा उपप्राचार्या आणि कौशल्य विकसन अभ्यासवर्गाच्या समन्वयक डॉ. चित्रा गोस्वामी यांनी विभागाचा अभ्यासवर्ग, युवाविधानसभा आयोजनामागील भूमिका उपस्थितांसमोर विशद केली. युवाविधानसभेच्या कामकाजाची सुरुवात वंदेमातरम् आणि महाराष्ट्रगीताने झाली. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनीच सत्ताधारीपक्ष आणि विरोधीपक्षनेते आणि सदस्यांची भूमिका बजावली. विधीमंडळ सत्राच्या कामकाजातील अनेक संकल्पनांचा अंतर्भाव करण्यात आला होता. याप्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधींनी प्रामुख्याने राज्यातील महिला आणि बालकांवरील अत्याचार, रोजगारपूरक शिक्षण, कोकणातील विविध प्रश्न, रिफायनरीप्रकल्प, नवीन शैक्षणिक धोरण, मराठी भाषेला प्राप्त झालेला अभिजात दर्जा आणि तिच्या प्रसारासाठी केले जाणारे प्रयत्न इ. पैलूंवर साधक-बाधक चर्चा केली. ष्ट्रगीताने युवाविधानसभेची सांगताझाली. शालेय विद्यार्थ्यांना संसदीय आणि विधिमंडळीय कामकाजाची माहितीव्हावी या हेतूने जी.जी.पी. एस. शाळेतील ४० विद्यर्थ्याना निमंत्रित करण्यात आले होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शास्त्र शाखा उपप्राचार्या आणि पीएम- उषा समन्वयक डॉ. अपर्णा कुलकर्णी म्हणाल्या, गेल्या वर्षी ४३ महाविद्यालयांना पीएम-उषाअंतर्गत अनुदान प्राप्त झाले. त्यापैकी एक आपले महाविद्यालय आहे. मान्यतः समाजाचाराजकारणाकडे पाहण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा आहे. राजकारणात सर्वच वाईट नसतात. काहीजण जनतेचे प्रश्नमांडून, त्यांची सोडवणूक करून चांगले कार्य करीत त्यामुळे युवकांनी राजकारणाकडे समाजाचे नेतृत्व करण्याची संधी म्हणून पाहिले पाहिजे, असेत्या पुढे म्हणाल्या.
याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर, कला, वाणिज्य आणि शास्त्र शाखेच्या उपप्राचार्या अनुक्रमे डॉ. चित्रा गोस्वामी, डॉ. सीमा कदम आणि डॉ. अपर्णा कुलकर्णी आदी उपस्थित होते. यानंतर सहभागी विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीपणे पारपाडण्यासाठी राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. निलेशपाटील, प्रा. कृष्णात खांडेकर, श्री. संजीव दांडेकर, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, सेवकवर्ग आणि विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. ओंकार आठवले याने, तर आभारप्रदर्शन प्रा. निलेश पाटील यांनी केले.