(जाकादेवी / वार्ताहर)
मंथन द स्कूल ऑफ क्रिएटिव्ह ॲडव्हर्टायझिंग अँड आर्ट रत्नागिरी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कॅलिग्राफर प्राध्यापक विनोद महाबळे यांची एक दिवसीय कार्यशाळेत प्रा. विनोद महाबळे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यशाळेसाठी जिल्ह्यातून एकूण २५ विद्यार्थी सहभागी झाले होते. कार्यशाळेत बेसिक कॅलिग्राफी ते अभिव्यक्त होणारी क्रिएटिव्ह कॅलिग्राफी चे मुलभूत तत्वज्ञान,अक्षरांचे स्ट्रोक आणि प्रदीर्घ अनुभवांची कमाल सांगड घालत विनोद महाबळे यांनी कार्यशाळेत रंगत आणली. या कार्यशाळेचा शुभारंभ पाहुण्यांचे स्वागत करुन करण्यात आला. जेष्ठ रंगकर्मी, लेखक,अभिनेते सुहास भोळे यांच्या शुभहस्ते प्रा.विनोद महाबळे यांचा शाल, रोपटे, पुस्तक आणि मंथनची ओळख असणारी डायरी देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी मालगुंड,- निवेंडी (भगवतीनगर) कलाप्रेमी नागरिक नंदकुमार यादव,शाखाप्रमुख प्रा.संदेश पालये, प्रा.प्रतिक्षा पांचाळ आणि पालकवर्ग उपस्थित होते.