(जाकादेवी / वार्ताहर)
मंथन द स्कूल ऑफ क्रिएटिव्ह ॲडव्हर्टायझिंग अँड आर्ट या कार्यशाळेसाठी एकूण २० विद्यार्थी सहभागी झाले होते. या कार्यशाळेत प्रात्यक्षिकांसह कलेच्या मुलभूत घटकांपासून स्वतः नवीन आकारांची निर्मिती कशी करावी, रंगसंगती आणि रंगलेपन पद्धत कशी निवडावी, रेखाटलेली चित्रे कशी वाचावीत, आभासी कल्पना आणि प्रत्यक्ष चित्रांची मांडणी याचे मुलभूत तत्वज्ञान अजित मते यांनी कार्यशाळेत सांगितले.मते सर हाजी दाउद अमिन हायस्कूल, कालुस्ता, ता.चिपळूण येथे कलाध्यापक आहेत.
या कार्यशाळेचा शुभारंभ पाहुण्यांचे स्वागत करुन करण्यात आला. नेवरे हायस्कूल व ज्युनिअर काॅलेजचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक आणि ज्येष्ठ कलाशिक्षक बबन तिवडे यांच्या शुभहस्ते प्रा. अजित मते यांचा शाल, रोपटे, आणि मंथनची ओळख असणारी डायरी देऊन सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शाखाप्रमुख प्रा.संदेश पालये, प्रा.प्रतिक्षा पांचाळ उपस्थित होते.