(संगमेश्वर)
कृषिभूषण डॉ.तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्था संचलित गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालय मांडकी पालवन अंतर्गत शेतकरी राजा संघाच्या तर्फे मूल्यवर्धन उत्पादन भाज्या आणि फळे व दूध घरगुती व्यवसाय या विषयावर एक दिवसीय महिला शेतकरी प्रशिक्षणाचा कार्यक्रम कळंबूशी या गावात दिनांक 25 जुलै रोजी आयोजित करण्यात आला. सदर कार्यालय शाळेत गावातील सर्व महिला बचत गटातील महिला तसेच गावातील ग्रामपंचायत महिला सदस्य व उपसरपंच यांनी उपस्थित दर्शवली.
ग्रामीण कृषी कार्यानुभव अंतर्गत शेतकरी राजा संघाच्या कृषिदूत संकेत लोखंडे,राहुल वाघमोडे,तनिष्क दुपारगुडे, सुराज पांढरे व रविराज पाटील यांनी अननसाचे जाम तयार करण्याची प्रक्रिया सांगून ती करून दाखवली. सोबत तुम्ही कमी खर्चांमध्ये घरगुती व्यवसाय करून जास्तीत जास्त नफा कसा मिळू शकतात ते सांगितले. त्यानंतर प्रशांत गाडे, पृथ्वीराज अहिरेकर, वेदांत बाबर, अभिषेक भोसले या कृषीदुतांनी दुधाचे मूल्यवर्धन कसे करावे सोबतच बासुंदी बनवण्याची प्रक्रिया सांगून प्रदर्शन केले.
कृषिदूत रोहित कांबळे याने शासनाकडून महिलांसाठी मिळणाऱ्या योजनेबद्दल माहिती सांगितली. ओंकार क्षिरसागर याने कार्यक्रमाच्या विविध जबाबदारी सांभाळल्या. हा कार्यक्रम गावचे पोलीस पाटील सौ.सोनिया राजेश चव्हाण, विषय विशेषज्ञ कार्यक्रमाधिकारी सौ.साक्षी गजानन तांबे यांच्या उपस्थित यशस्वीरित्या पार पडला.