(रत्नागिरी)
जिल्हा रुग्णालय रत्नागिरी, समता फाउंडेशन मुंबई रामनाथ हास्पिटल रत्नागिरी, तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड यांच्या संयुक्त विद्यमाने श्री देव भैरी भगवती मंदिर येथे नवरात्र उत्सवानिमित्त नेत्र तपासणी व व रक्ताच्या तपासणी आयोजित करण्यात आली होती. या शिबिरामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या वतीने व समता फाउंडेशन मुंबई यांच्या सौजन्याने डॉ. सौं नेहा टिळक यांनी नेत्र तपासणी केली. या तपासणीमध्ये मोतीबिंदू सदृश्य आढळलेल्या रुग्णांची मोफत शस्त्रक्रिया जिल्हा रुग्णालय येथे होणार आहे.
यावेळी रामनाथ हॉस्पिटलच्यावतीने डॉ. रुशांक डंबे यांनी रुग्णांची आरोग्य तपासणी केली, तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने रुग्णांच्या रक्त चाचण्या करण्यात आल्या. या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा जाधव, रामनाथ हॉस्पिटल चे डॉ रुशांक डंबे, जिल्हा रुग्णालयच्या डॉ नेहा टिळक यांनी उपस्थित राहून तपासण्या केल्या.
सदर शिबीर मालगुंड आरोग्य केंद्राचे आरोग्य सहाय्यक डॉ परशुराम निवेंडकर,यांचे माध्यमातून रबविण्यात आले होते. यावेळी समता फाउंडेशन मुंबईचे वतीने श्री. नितेश शेट्ये, cho श्रीम माधुरी ठाकरे, आरोग्य सेवक श्री किरण झगडे, आरोग्य सेविका श्रीम दीपा गावडे, श्रीम.अश्विनी गोवळकर, श्रीम. स्वाती कदम,श्रीम भाटकर, श्रीम मांडवकर लॅब टेक्निशियन श्रीम. श्रुतिका मोहित, गट प्रवर्तक श्रीम. आढाव, वाहन चालक श्री. राहुल जाधव आशा सेविका श्रीम घाणेकर, श्रीम कोकरे इत्यादी उपस्थित होते.
यावेळी एकूण 72 रुग्णांची तपासणी कारण्यात आली, त्यातील 18 मोतीबिंदू सदृश्य रुग्ण आढळले. 16 नागरिकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तसेच 8 रुग्णांची ecg तपासणी करण्यात आली, सर्वच रुग्णांची रक्त चाचणी करसण्यात आली. श्री देव भगवती नवराष्ट्र उत्सव समितीचे वतीने उत्तम नियोजन करण्यात आले होते.