(रत्नागिरी)
होळीसाठी मुंबई, पुण्यातून गावी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेने खुशखबर दिली आहे. मागील दोन-तीन दिवसांपासून रेल्वेने होळी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. त्यात नव्याने जाहीर केलेल्या आठ गाड्यांमध्ये चिपळूणपर्यंत धावणाऱ्या व सर्व स्थानकांवर थांबणाऱ्या मेमू स्पेशल लोकल गाडीचाही समावेश आहे.
दि. २५ मार्च २०२४ रोजी धूलिवंदन अर्थात होळी सणातील मुख्य दिवस आहे. कोकणात होळीला मोठे महत्त्व असल्याने या कालावधीत रेल्वेकडून कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालवल्या जातात. कोकण रेल्वे मार्गावर विविध ठिकाणांहून होळीसाठी यापूर्वी काही गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत.त्यामध्ये आता आणखी आठ गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. रोहा ते चिपळूण (०१५९७/०१५९८) या मेमू लोकल ट्रेनचाही समावेश आहे. या गाडीच्या २२ फेऱ्या होणार आहेत. रोहा येथून ही गाडी शुक्रवार दि. ८ मार्चपासूनच सुरू झाली आहे. दि. ३० मार्च २०२४ पर्यंत मेमू लोकल ट्रेन रोहा ते चिपळूण मार्गावर एकूण २२ फेऱ्या करणार आहे. रोहा येथून ही गाडी ११ वाजून ०५ मिनिटांनी सुटेल आणि दुपारी १.३० वाजता ती चिपळूण स्थानकावर पोहोचेल. चिपळूण येथून ही गाडी दुपारी १ वाजून ४५ मिनिटांनी सुटून सायंकाळी ४ वाजून १० मिनिटांनी रोह्याला पोहोचेल.
आठ डब्यांची ही अनारक्षित गाडी रोहा येथून पुढे दिव्यापर्यंत नियमितपणे चालवली जात असल्याने चिपळूण येथून या गाडीने दिव्यापर्यंत प्रवास करणे शक्य होणार आहे. याचबरोबर चिपळूणला येण्यासाठी ही गाडी रोहा येथून सुटण्याआधी सकाळी दिव्यावरून सुटत असल्याने चिपळूणला येताना देखील रोहा- चिपळूण असा मेमू लोकलने दिवा येथून चिपळूणपर्यंत थेट प्रवास करणे शक्य होणार आहे.
या आहेत आठ होळी विशेष गाड्या
1) 01187/01188 एलटीटी–थिविम–एलटीटी साप्ताहिक विशेष
– गाडी क्र. 01187 एलटीटी-थिविम साप्ताहिक विशेष एलटीटी येथून गुरुवारी (दि. 14, 21 आणि 28 मार्च) रात्री 10.15 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 9.50 वाजता थिविमला पोहोचेल.
– गाडी क्र. 01188 थिविम-एलटीटी साप्ताहिक विशेष थिविम येथून शुक्रवारी (दि. 15, 22 आणि 29 मार्च) सायंकाळी 4.35 वाजता सुटेल आणि एलटीटी येथे दुसर्या दिवशी पहाटे 3.45 वाजता पोहोचेल.
– थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड
– डबे (22 एलएचबी कोच) : फर्स्ट एसी (1), एसी 2 टायर (3), एसी 3 टायर (15), पँट्री कार (1), जनरेटर कार (2)
2) 01441/01442 पुणे जं.-सावंतवाडी रोड–पुणे जं. साप्ताहिक विशेष
– गाडी क्र. 01441 पुणे जं.-सावंतवाडी रोड साप्ताहिक विशेष पुणे जंक्शन येथून मंगळवारी (दि. 12, 19 आणि 26 मार्च) सकाळी 9.35 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10.30 वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.
– गाडी क्र. 01442 सावंतवाडी रोड-पुणे जं. साप्ताहिक विशेष सावंतवाडी रोडवरून बुधवारी (दि. 13, 20 आणि 27 मार्च) रात्री 11.25 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी दुपारी 12.15 वाजता पुणे जंक्शनला पोहोचेल.
– थांबे : लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ
– डबे (20 एलएचबी कोच) : एसी 2 टायर (3), एसी 3 टायर (15), जनरेटर कार (1), एसएलआर (1)
3) 01444/01443 सावंतवाडी रोड–पनवेल–सावंतवाडी रोड साप्ताहिक विशेष
– गाडी क्र. 01444 सावंतवाडी रोड-पनवेल साप्ताहिक विशेष सावंतवाडी रोडवरून मंगळवारी (दि. 12, 19 आणि 26 मार्च) रात्री 11.25 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 8.40 वाजता पनवेलला पोहोचेल.
– गाडी क्र. 01443 पनवेल-सावंतवाडी रोड साप्ताहिक विशेष पनवेल येथून बुधवारी (दि. 13, 20 आणि 27 मार्च) सकाळी 9.40 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 8.05 वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.
– थांबे : कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, राजापूर रोड, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, चिपळूण, खेड आणि रोहा
– डबे (20 एलएचबी कोच) : एसी 2 टायर (3), एसी 3 टायर (15), जनरेटर कार (1), एसएलआर (1)
4) 01107/01108 एलटीटी–थिविम–एलटीटी साप्ताहिक विशेष
– गाडी क्र. 01107 एलटीटी-थिविम साप्ताहिक विशेष एलटीटीवरून शुक्रवारी (दि. 15, 22 आणि 29 मार्च) रात्री 10.15 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 9.50 वाजता थिविमला पोहोचेल.
– गाडी क्र. 01108 थिविम-एलटीटी साप्ताहिक विशेष थिविम येथून रविवारी (दि. 17, 24 आणि 31 मार्च) सकाळी 11 वाजता सुटेल आणि एलटीटी येथे त्याच दिवशी रात्री 11.55 वाजता पोहोचेल.
– थांबे : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड
– डबे (18 कोच) : फर्स्ट एसी (1), एकत्रित फर्स्ट एसी अधिक एसी 2 टायर (1), एसी 2 टायर (1), एसी 3 टायर (5), जनरल (8) कोच, एसएलआर (2)
5) 01110/01109 थिविम–पनवेल–थिविम साप्ताहिक विशेष
– गाडी क्र. 01110 थिविम-पनवेल साप्ताहिक विशेष थिविम येथून शनिवारी (दि. 16, 23 आणि 30 मार्च) सकाळी 11 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10.15 वाजता पनवेलला पोहोचेल.
– गाडी क्र. 01109 पनवेल-थिविम साप्ताहिक विशेष पनवेल येथून शनिवारी (दि. 16, 23 आणि 30 मार्च) रात्री 11.55 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 9.50 वाजता थिविमला पोहोचेल.
– थांबे : सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव आणि रोहा
– डबे (18 कोच) : फर्स्ट एसी (1), एकत्रित फर्स्ट एसी अधिक एसी 2 टायर (1), एसी 2 टायर (1), एसी 3 टायर (5), जनरल (8) कोच, एसएलआर (2)
6) 01445/01446 पुणे जं.-थिविम–पुणे जं. साप्ताहिक विशेष
– गाडी क्र. 01445 पुणे जं.-थिविम साप्ताहिक विशेष पुणे जंक्शन येथून शुक्रवारी (दि. 8, 15, 22 आणि 29 मार्च) सायंकाळी 6.45 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 8.30 वाजता थिविमला पोहोचेल.
– गाडी क्र. 01446 थिविम-पुणे जं. साप्ताहिक विशेष थिविम येथून रविवारी (दि. 10, 17, 24 आणि 31 मार्च) सकाळी 9.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11.55 वाजता पुणे जंक्शनला पोहोचेल.
– थांबे : लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड
डबे (22 कोच) : एसी 2 टायर (1), एसी 3 टायर (4), स्लीपर (11), जनरल (4), एसएलआर (2)
7) 01448/01447 थिविम–पनवेल–थिविम साप्ताहिक विशेष
– गाडी क्र. 01448 थिविम-पनवेल साप्ताहिक विशेष थिविम येथून शनिवारी (दि. 9, 16, 23 आणि 30 मार्च) सकाळी 9.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 9 वाजता पनवेलला पोहोचेल.
– गाडी क्र. 01449 पनवेल-थिविम साप्ताहिक विशेष पनवेल येथून शनिवारी (दि. 9, 16, 23 आणि 30 मार्च) रात्री 10 वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी सकाळी 8.30 वाजता थिविमला पोहोचेल.
– थांबे : सावंतवाडी रोड, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली, वैभववाडी रोड, राजापूर रोड, विलवडे, आडवली, रत्नागिरी, संगमेश्वर रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, माणगाव आणि रोहा
– डबे (22 कोच) : एसी 2 टायर (1), एसी 3 टायर (4), स्लीपर (11), जनरल (4), एसएलआर (2)
8) 01597/01598 रोहा–चिपळूण–रोहा मेमू विशेष
– गाडी क्र. 01597 रोहा-चिपळूण मेमू विशेष रोहा येथून दि. 8, 9, 11, 15, 16, 18, 22, 23, 25, 29 आणि 30 मार्च रोजी सकाळी 11.05 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 1.30 वाजता चिपळूणला पोहोचेल.
– गाडी क्र. 01598 चिपळूण-रोहा मेमू विशेष चिपळूण येथून दि. 8, 9, 11, 15, 16, 18, 22, 23, 25, 29 आणि 30 मार्च रोजी दुपारी 1.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 4.10 वाजता रोह्याला पोहोचेल.
– थांबे : कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी, कळंबणी बुद्रुक, खेड आणि अंजनी
– डबे (8 कार मेमु)
दरम्यान, गाडी क्र. 01445/01446, 01447/01448 चे आरक्षण दि. 8 मार्च आणि गाडी क्र. 01188/01187, 01441/01442, 01443/01444, 01107/01108, 01109/01110 यांचे आरक्षण प्रक्रिया रविवार, दि. 10 मार्चपासून सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली, इंटरनेट आणि ‘आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. तसेच वरील गाड्यांचे तपशीलवार थांबे आणि वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे अथवा एनटीईएस अॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.