( रत्नागिरी )
दि.बुध्दिस्ट सोसायटी ऑफ् इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रत्नागिरी संस्कार विभाग यांच्या वतीने आषाढ पौर्णिमा ते आश्विन पौर्णिमा या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात सुरू झालेल्या वर्षावास कार्यक्रमाचा सांगता समारंभ गुरुवार दिनांक. दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा संस्कार उपाध्यक्ष विजय जाधव यांच्या अध्यक्षतेखाली माता रमाई राष्ट्रीय स्मारक वणंद दापोली येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाला कालाम सुत्त (मानव मुक्तीचा जाहीरनामा) या विषयावर प्रवचनकार आयु.विकास पवार केंद्रीय शिक्षक संस्कार विभाग सचिव हे प्रवचन देणार आहेत. यावेळी सदर कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक अनंत सावंत जिल्हाध्यक्ष एन्.बी.कदम जिल्हा महासचिव प्रदिप जाधव जिल्हा कोषाध्यक्ष हे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष अनिल घाडगे अध्यक्ष तालुका दापोली तर सुत्रसंचलन आयु अल्पेश सकपाळ जिल्हा संस्कार विभाग सचिव हे करणार आहेत.
या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती विजय कांबळे (जिल्हा कार्यालयीन) सचिव जनार्दन मोहिते, (जिल्हा उपाध्यक्ष प्रचार – पर्यटन विभाग) शरणपाल कदम (जिल्हा संरक्षण विभाग) सुनिल पवार (जिल्हा हिशोब तपासणीस) सुनिल धोत्रे (जिल्हा संघटक) संतोष धोत्रे (जिल्हा संघटक) राहूल मोहिते (अध्यक्ष संगमेश्वर) विजय मोहिते (अध्यक्ष रत्नागिरी) आर.बी.कांबळे (अध्यक्ष लांजा ) सत्यवान जाधव ( अध्यक्ष राजापूर ) जयरत्न कदम (अध्यक्ष चिपळूण) विद्याधर कदम (अध्यक्ष गुहागर) अ.के मोरे (अध्यक्ष खेड) अनिल घाडगे (अध्यक्ष दापोली) हर्षद जाधव (अध्यक्ष मंडणगड) दिपक धोत्रे (अध्यक्ष वणंद ग्राम शाखा) हे उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाला जिल्ह्यातील जिल्हा, तालुका,शहर, पदाधिकारी व बौद्धाचार्य,मा.श्रामणेर, केंद्रीय शिक्षक/शिक्षिका, सैनिक तसेच उपासक/उपासिका यांनी उपस्थित रहावे असे सुचित करण्यात येत आहे.