( देवरूख )
संगमेश्वर तालुक्यातील देवरूख कुंभ्याचा दंड येथे गेली अनेक दिवस माकडांचा हैदोस सुरू आहे. माकडांच्या या धुमाकुळाने वाडीतील ग्रामस्थ हैराण झाले आहेत. कुंभ्याचा दंड येथील नंदकुमार रघुनाथ दामुष्टे (वय-६५) यांचेवर माकडाने हल्ला केल्याने ते जखमी झाले आहेत.
नंदकुमार दामुष्टे हे घरी झोपलेले असताना गुरूवारी संध्याकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास घरात शिरलेल्या माकडाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. दामुष्टे यांच्यावर माकडाने हल्ला केल्याने त्यांच्या कपाळावर दुखापत झाली असून चेहऱ्यालाही बुचकरले आहे. मुलगा नरेंद्र दामुष्टे याने नंदकुमार यांना उपचारासाठी देवरूख ग्रामीण रूग्णालयात त्वरीत केले दाखल केले आहे.
कुंभ्याचा दंड येथील तरूण सामाजिक कार्यकर्ते वैभव संसारे व साईन दामुष्टे यांनी वनविभागाला या प्रकाराची माहिती दिली. देवरूखचे वनपाल तौफीक मुल्ला यांनी तातडीने देवरूख ग्रामीण रूग्णालयात जावून जखमी नंदकुमार दामुष्टे यांची केली विचारपुस व त्यानंतर कुंभ्याचा दंड येथे जावून घटनास्थळी केली पाहणी.