(गुहागर)
गुहागर तालुक्यातील बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांची वाढती संख्या, परंतु त्यांच्याकरिता असलेली अपुरी वैद्यकीय सुविधा व शिक्षण या गोष्टींची कमतरता भरून काढण्यासाठी ग्राम आधार स्वयंसेवी संस्थेने ठोस उपाययोजना करून सन 2016 साली जीवनज्योती विशेष शाळा, शृंगारतळी, पालपेने रोड, गुहागर येथे सुरू केली. ग्राम आधार संस्थेचा उद्देश हाच की प्रत्येक बौद्धिक अक्षम विद्यार्थी शिक्षण, कला गुण, खेळातून पुढे जाऊन त्या विद्यार्थ्यांस एक चांगली ओळख निर्माण करून देणे. पण कोविड नंतर मात्र ऑटिझम, ADHD, मंदविकास, बौद्धिक अक्षम, डाऊन सिंड्रोम या विद्यार्थ्यांच्या संस्थेत होणारी लक्षणे वाढ अनेक गावागावात सर्वे करताना पुढे आली. परंतु ऑटिझम म्हणजे काय? एडीएचडी म्हणजे काय? याची माहिती जणू पालकांना नसणे असल्यास ते स्वीकार्य नसणे जर स्वीकार्य असल्यास पुढे काय? या सर्व प्रश्नांची तळाशी जाऊन संस्थेने शीघ्र निदान उपचार केंद्र सुरू करून त्याचबरोबर व्यावसायिक थेरपी म्हणजे ऑक्युपेशनल थेरपी सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सदर थेरपी सुरू करताना अनेक साहित्याची गरज संस्थेला होती याकरिता संस्थेने रोटरी क्लब ऑफ चिपळूण व रोटरी क्लब ऑफ पिंपरी या दोन्ही क्लबच्या पुढे विषयी नेऊन योग्य नियमांच्या पालनाने योग्य वेळेत साहित्य उपलब्ध करून दिले. या थेरपी सेंटरचे आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 वाजता सर्वांच्या उपस्थित ऑक्युपेशनल सेंटरचे उद्घाटन झाले. सर्व मान्यवरांनी या सर्व अवस्थांबद्दल माहिती जाणून घेतली. सर्व वाचकांना ही आवाहन आहे की, आपल्या नात्यात तसेच आजूबाजूस आपल्या ओळखीत सहा महिन्यापासून ते बारा वर्षापर्यंत असे मूल ज्यामध्ये एखादे मूल एका जागी शांत न बसणे, हाकेला प्रतिसाद न देणे, चंप्यांवर म्हणजेच पायाच्या बोटांवर उभे राहून चालणे, हॅन्ड फ्लेपिंग, स्पीच प्रॉब्लेम, खेळणी ओळीने मांडणे, गोल फिरणे अशी काही लक्षणे दिसत असल्यास जीवनज्योती विशेष शाळा, शृंगारतळी, गुहागर 9623980184 या क्रमांकावर संपर्क करून योग्य स्पीच थेरपीस्ट, ऑक्युपेशनल थेरपीस अशा योग्य तज्ञांच्या सल्ल्याने सर्वोत्तम उपचार पद्धतीचा लाभ दापोली, खेड, चिपळूण, गुहागर तालुक्यातील अशा मुलांच्या पालकांनी नक्की घेणे. जेवढे लवकर लहान वयात उपचार पद्धती सुरू करता येईल याकडे पालकांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. हा सर्व प्रोजेक्ट रोटे. डॉक्टर अतीन औताडे यांनी पार पाडला. या कार्यक्रमाची साठी रोटरी क्लबच्या वतीने श्री अविनाश पालशेतकर अध्यक्ष, राजेश ओतारी चिटणीस, प्रसाद सागवेकर, प्रशांत देवळेकर, सुनील वाडेकर, दिगंबर सुर्वे तसेच रोटर एकतर्फे ओंकार ओतारी अध्यक्ष, आर्यन पालशेतकर, अभिषेक कदम, अभिराज संसारे हे उपस्थित होते. रोटरॅक्ट कडून शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप करण्यात आले.