(किचन क्वीन)
साऊथ इंडिअन हॉटेलमध्ये निरनिराळ्या प्रकारचे डोसे मिळतात. डोसाचे नाव व प्रकार पाहून आणि ऐकूनच आपले पोट भरते. पण जेव्हा आपण घरात असा कुरकुरीत डोसा बनवण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हाला खास डोसा तवा लागतो. रवा डोसा, मसाला डोसा, मुगाचे डोसे असे याचे विविध प्रकार असतात. सहसा आपण हा पदार्थ बटाट्याची भाजी, सांबार आणि चटणीबरोबर आवडीने खातो.
डोसा जितका कुरकुरीत असेल तितकी खायला मजा येते. पण जेव्हा तुम्ही घरात असा कुरकुरीत डोसा बनवण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्हांला खास डोसा तवा लागतो. नॉन स्टिकच्या डोसा तव्यावर असे कुरकुरीत डोसे नक्कीच बनवता येतात. पण जर तुमच्याकडे खास डोसा तवा नसेल तरी तुम्ही कोणत्याही तव्यावर म्हणजे अगदी लोखंडी तव्यावरही हॉटेलप्रमाणे कुरकुरीत डोसा बनवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त या काही टिप्स फॉलो करण्याची गरज आहे. ज्यामुळे डोसा कधीच कोणत्याही तव्यावर चिकटणार नाही आणि मस्त कुरकुरीत होईल.
नॉन स्टिकच्या डोसा तव्यावर असे कुरकुरीत डोसे नक्कीच बनवता येतात. पण जर तुमच्याकडे खास डोसा तवा नसेल तरी तुम्ही कोणत्याही तव्यावर म्हणजे अगदी लोखंडी तव्यावरही हॉटेलप्रमाणे कुरकुरीत डोसा बनवू शकता. यासाठी तुम्हाला फक्त या काही टिप्स फॉलो करण्याची गरज आहे. ज्यामुळे डोसा कधीच कोणत्याही तव्यावर चिकटणार नाही आणि मस्त कुरकुरीत डोसा तयार.
तव्यावर डोसा चिकटू नये यासाठी या टिप्स करा फॉलो –
- डोसा बनवण्यापूर्वी तुमचा लोखंडी तवा स्वच्छ करून घ्या. डोसा बॅटर तव्यावर टाकताना तव्याला कोणताही चिकट पदार्थ चिकटलेला नसावा.
- सर्वात आधी तव्याला तेल लावून घ्या आणि तवा गरम करा. त्यानंतर गॅस बंद करा आणि तवा थंड होऊ द्या. थंड झाल्यावर गॅस पुन्हा सुरू करा आणि तवा गरम करून घ्या.
- तव्यावरील सर्व तेल टिश्यू पेपर अथवा कोरड्या फडक्याने पुसून घ्या. या ट्रिकमुळे तवा तेलकट होईल आणि त्यावर डोसा चिकटणार नाही.
- कोरडा केल्यावर तव्यावर काही थेंब पाणी शिंपडा ज्यामुळे तुम्हाला तवा डोसा बॅटरसाठी तयार आहे हे समजेल.
अशा गरम तव्यावर पळीने डोसा बॅटर टाका आणि लगेच डोसा बनवून घ्या. - डोसा तव्यावर घालण्याआधी, तव्यावर चमचाभर तेल सोडून घ्या. आता एक कांदा सोलून तो अर्धा कापून, कांदा काटा चमच्याला अडकवून घ्यावा. या काटा चमच्याला अडकवलेल्या कांद्याने तव्यावरील तेल संपूर्ण तव्यावर पसरवून घ्यावेत. यामुळे तुमचा डोसा तव्याला खालून चिकटणार नाही.
- डोसा पलटण्यासाठी उलथणे अथवा चमचा पाण्यात बुडवा आणि डोसा सोडवण्याचा प्रयत्न करा.
- काही डोसे बनवल्यानंतर तवा चिकट झाला असेल तर तो स्वच्छ करण्यासाठी तुम्ही एखादा कांदा अथवा नारळाची शेंडी तेलात बुडवून त्याने तवा स्वच्छ करू शकता.
- काही डोसे बनवल्यानंतर तवा चिकट झाला असेल तर तो स्वच्छ करण्यासाठी तुम्ही एखादी नारळाची शेंडी तेलात बुडवून त्याने तवा स्वच्छ करू शकता.
- डोसा तव्यावर टाकल्यानंतर त्याच्या गोलाकार तेल सोडावे.
- त्यानंतरही डोसा चिकटत असेल तर थोडं पीठ तव्यावर भुरभुरा आणि ते कापडाने स्वच्छ करून घ्या.
या काही सोप्या टिप्स तुम्ही फॉलो केल्या तर डोसा बनवण्यासाठी तुम्हाला नॉन स्टिक तव्याची गरज लागणार नाही. कारण अगदी कोणत्याही तव्यावर तुम्ही कुरकुरीत डोसा बनवू शकता.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1