(दापोली)
तालुक्यातील आसुद गावचे रहिवासी,जूनी पेन्शन हक्क संघटनचे शिक्षक नेते, नितीन अर्जून बांद्रे यांची रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोशिएशनच्या प्रमुख कार्यवाह पदी नुकतीच बिनविरोध निवड झाली असून, बांद्रे यांचे दापोलीसह जिल्हाभरातून अभिनंदन होत आहे.
बालपणा पासून कबड्डीची आवड असलेले, ज्यांनी स्वत: कबड्डी खेळत इतरांनाही आवड निर्माण केली, मुलींसाठी संघर्ष कबड्डी संघ तयार केला आणि कबड्डी खेळात दापोली तालुक्यात एक वेगळं स्थान निर्माण केलं, असे अखिल भारतीय कबड्डी पंच परीक्षा उत्तीर्ण असलेले, तसेच जिल्हा कबड्डी पंचप्रमुख म्हणून कार्यरत असलले, ज्यांनी आसूद रेवाळेवाडी शाळेमध्ये गेले अनेक वर्षे वस्ती शाळा ते नियमित शाळा निर्माण करीत ज्ञानदानाचे धडे दिले. मुर्ती लहान पण किर्ती महान असे व्यक्तिमत्व असलेल्या नितीन बांद्रे यांच्या जिल्हा कार्यवाह निवडीबद्दल अखिल शिक्षक संघटना,तसेच जूनी पेन्शन हक्क संघटन यांचे वतीने त्यांचा सत्कार करणेत आला.
अखिल जिल्हाध्यक्ष प्रविण काटकर, तालुकाध्यक्ष विजय फंड, जूनी पेन्शन हक्क संघटन तालुकाध्यक्ष भालचंद्र घुले, स्वप्नील परकाळे, विश्वास भोपे, कर्देचे व्यवस्थापन अध्यक्ष दिनेश रुके, आदिंच्या हस्ते बांद्रे यांचा सत्कार करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.