( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
रत्नागिरी पोलीस दलाच्या वतीने गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे शुक्रवारी, दि. ७ फेब्रुवारी २९२५ रोजी ११ ते १२.४५ वेळेत नविन कायदे व अंमलबजावणी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला गोगटे महाविद्यालयाचे कार्याध्यक्ष श्री. शिल्पताई पटवर्धन, श्री. मकरंद साखरकर (प्रीन्सिपल), श्रीमती. चित्रा गोस्वामी, प्राध्यापक ऍड. सोनाली खेडेकर, ऍड. आशिष बर्वे, श्री. सुनील गोसावी, (प्राध्यापक) गोगटे महाविद्यालय रत्नागिरी ज्युनिअर कॉलेज, कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या कार्यशाळेला मार्गदर्शन करताना मान्यवर मंडळींनी विविध कायद्यासंदर्भात माहिती दिली. यामध्ये पोसा कायदा, विशाखा समिती, निर्भया समिती, लहान मुला-मुलीचा लैगिंक छळ अशा अनेक क्रुत्याचे प्रकार सांगून कायद्यात झालेल्या अमुलाग्र बदल, बदललेल्या कायद्यांचा ऊद्देश व कायद्याचा धाक व नमुद केलेल्या शिक्षेबाबत माहीती दिली.
![गोगटे जोगळेकर महाविद्यालयात नविन कायदे व अंमलबजावणी कार्यशाळा; विद्यार्थी, नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद 8 कार्यशाळेला विद्यार्थी, नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद](https://ratnagiri24news.com/wp-content/uploads/2025/02/IMG-20250207-WA0288-300x225.jpg)
![गोगटे जोगळेकर महाविद्यालयात नविन कायदे व अंमलबजावणी कार्यशाळा; विद्यार्थी, नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद 8 कार्यशाळेला विद्यार्थी, नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद](https://ratnagiri24news.com/wp-content/uploads/2025/02/IMG-20250207-WA0288-300x225.jpg)
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) या कायद्यातील तरतुदी, मोबाईलचा वापर, इलेक्ट्रॉनिक वस्तुचा वापर व त्यातून निर्माण होणारे दखल पात्र अपराध याबाबत सखोल विश्लेषण करून माहीती दिली. पाठलाग, ऑनलाईन पाठलाग, धार्मिक पोस्ट, धर्माचा अपमान करणारे ईमेज-मेसेज व्हीडीओ फॅारवर्ड करणे प्रसारीत करणे याचे देखील गांभीर्य समजावुन सांगितले.
ऑनलाईन फ्रॅाड, लिंकवर क्लीक, ओटीपी शेअर , आलेल्या मेसेजची/व्हीडीओची खात्री याबाबत जागृत राहणे आवश्यक आहे. बीएनएसएसमधील इलेक्ट्रॉनिक पुरावे त्याचे महत्व कायद्यात मान्यता व शिक्षा याबाबत सविस्तर माहीती दिली तसेच महाविद्यालयीन स्तरावर महिला कक्ष, तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात यावे याबाबत सूचना करण्यात आल्या. या कार्यशाळेला सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, सुमारे १०० ते १५०० विद्यार्थी, नागरिकांचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी माईंनकर, आयपीएसएस निखील पाटील, शहर पोलीस निरीक्षक शिवरकर आदी उपस्थित होते.