(दापोली)
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद रत्नागिरी व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय 17 वर्षे (मुले) वयोगटातील कबड्डी स्पर्धेत न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज टाळसुरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अजिंक्यपद पटकावले. या स्पर्धेत एम. के. इंग्लिश स्कूल आंजर्ले विद्यालयाला उपविजेते पद प्राप्त झाले.
एन. के. वराडकर हायस्कूल मुरुड येथे आयोजित केलेल्या दापोली तालुका कबड्डीस्पर्धेत टाळसुरे विद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेत्र दीपक कामगिरी करीत एकही सामना न गमावता अंतिम फेरीत मोठ्या फरकाने विजय संपादित केला.
मुरुड येथे झालेल्या स्पर्धेत 14 वर्षे (मुले) वयोगटात ए. जी. हायस्कूल विजेता तर लोकमान्य हायस्कूल दाभोळ उपविजेते, 14 वर्षे (मुली) ए. जी. हायस्कूल विजेता एन. के. वराडकर हायस्कूल मुरुड उपविजेता, 17 वर्षे (मुली) आई आनंदी गोपाळ महाजन कोळथरे विजेता, लोकमान्य हायस्कूल दापोली उपविजेता, 19 वर्षे (मुले) वराडकर कॉलेज विजेता ए जी हायस्कूल उपविजेता, 19 वर्षे (मुली) ए जी हायस्कूल, विजेता रामराजे ज्युनिअर कॉलेज उपविजेता पदाचे मानकरी ठरले.
सर्व विजेत्या संघांना 30 सप्टेंबर रोजी गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथे तालुक्याचे प्रतिनिधित्व करण्याची संधी प्राप्त झाली आहे. सर्व यशस्वी खेळाडूंना मुरुड येथे बक्षीस वितरण प्रसंगी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी तालुका समन्वयक अविनाश पाटील, शा. शिक्षण संघटनेचे अध्यक्ष अर्जुन घुले, प्रो कबड्डी पंच आशुतोष सांळुखे, युवा कबड्डी पंच सत्यवान दळवी, कबड्डी स्पर्धा प्रमुख बिपिन मोहीते, संदीप क्षीरसागर, प्रदीप शिगवण, अमित वाखंडे, समीर भोसले, मुरुड विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मधुमालती गारडे आदी मान्यवर उपस्थित होते.