(मुंबई)
नवरा माझा नवसाचा चित्रपटाचा पहिला भाग प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतला होता. मागील अनेक महिन्यांपासून मराठी प्रेक्षक त्यांच्या आवडत्या कॉमेडी चित्रपटाची आतूरतेने वाट पाहत होते. त्या सर्वांची प्रतिक्षा आता संपली आहे. कारण नवरा माझा नवासाचा या सिनेमाचा दुसरा भाग लवकरच येणार आहे. हा भाग पहिल्या भागाएवढाच कॉमेडी असेल का? चित्रपटात सहभागी झालेले नवे कलाकार त्यांच्या पात्रांना योग्य न्याय देतील का? असे प्रश्न प्रेक्षकांकडून उपस्थित केले जात होते.
नवरा माझा नवसाचा-2 या चित्रपटाचा दुसरा भाग येणार असून, प्रेक्षकांनाही या सिनेमाची बरीच उत्सुकता लागून राहिली आहे. येत्या 20 सप्टेंबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. काही दिवसांपूर्वी या सिनेमाचा एक टीझर रिलीज करण्यात आला. नवरा माझा नवासाचा 2 मध्ये अशोक सराफ, सिद्धार्थ जाधव, सचिन पिळगांवकर, स्वप्नील जोशी, हेमल इंगळे, सुप्रिया पिळगांवकर ही मंडळी दिसणार आहे. विशेष म्हणजे यंदाचा हा प्रवास एसटीबसने होणार नसून कोकण रेल्वेने होणार आहे.
बस प्रवासात अशोक सराफ जसे कंडक्चरच्या भूमीकेत होते. तसेच ते आता रेल्वेमध्ये टीसीच्या भूमीकेत असणार आहेत. एसटी बस प्रवासात नवरा माझा नवसाचा चित्रपटाची गोष्ट घडवल्यानंतर दुसर्या भागाची कथा कोकण रेल्वे प्रवासात घडणार आहे. नवरा माझा नवसाचा चित्रपटात बस कंडक्टर असलेले अशोक सराफ आता दुसर्या भागात टीसी झाले आहेत. सचिन पिळगावकर दिग्दर्शित “नवरा माझा नवसाचा” या गाजलेल्या चित्रपटानंतर तब्बल 19 वर्षांनी या सिनेमाचा सिक्वेल येणार आहे.
एस टी बस प्रवासात “नवरा माझा नवसाचा” चित्रपटाची गोष्ट घडवल्यानंतर आता “नवरा माझा नवसाचा 2” चित्रपटाची कथा कोकण रेल्वे प्रवासात घडणार आहे. नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाची निर्मिती, कथा – पटकथा आणि दिग्दर्शन सचिन पिळगांवकर यांनी केलं आहे तर संवाद संतोष पवार यांचे आहेत.