(संगमेश्वर / एजाज पटेल)
संगमेश्वर तालुक्यातील कोसुंब गावातील माजी सरपंच, संगमेश्वर तालुका शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री किरण जाधव यांना कर्नाटक राज्यातील बेळगांवी येथील सामाजिक सेवाभावी संस्थेमार्फत राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
कर्नाटक, गोवा, दिल्ली, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यातील काही निवडक व्यक्तींची राष्ट्रीय पुरस्कारासाठी या संस्थेमार्फत निवड करण्यात येते. कोसुंब येथील श्री जाधव यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय कामाची दखल घेऊन त्यांना हा राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
रविवारी दिनांक २७ रोजी बेळगांव येथे हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे. याप्रसंगी केंद्रीय मंत्री, सिने अभिनेता, मठाधिपती यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा साजरा होईल. विशेष प्रमाणापत्र, फेटा, चंदनाचा हार आणि सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आल्या बद्दल किरण जाधव यांचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.