(गणपतीपुळे / वैभव पवार)
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या रत्नागिरी तालुक्याचे तालुका निरीक्षक संदीप तांबेकर यांची पदोन्नती झाल्याने त्या रिक्त जागेवर अतिरिक्त कार्यभार सांभाळणारे नरेंद्र जाधव यांना नुकतेच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने सह सरव्यवस्थापकपदी बढती दिली आहे.
नरेंद्र जाधव हे मागील अनेक वर्षे सातत्याने बँकेच्या धोरणानुसार कार्य करत असून त्यांनी विविध पदावर लक्षणीय काम केले आहे. त्यामुळे त्यांच्या याच सहकारातील अभ्यासपूर्ण दृष्टिकोनाचा विचार करून रत्नागिरी जिल्हा बँकेने त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे.
या निवडीनंतर नरेंद्र जाधव यांनी सांगितले की, रत्नागिरी जिल्हा बँकेच्या उद्दिष्टानुसार बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे सर, उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली काम करताना बँकेच्या धोरणानुसार सर्वसामान्य ग्राहक, शेतकरी, यांच्यासाठी विविध कर्जयोजना, गुंतवणूक योजना राबवताना बँकेचा NPA कमी करून बँकेचा नफा वाढविण्यावर भर देणार असल्याचे सांगितले.
त्यांच्या या निवडीबद्दल रत्नागिरी जिल्हा बँकेचे संचालक रामचंद्र गराटे, गजानन पाटील, ऍड. दीपक पटवर्धन, मुन्ना खामकर, जितेंद्र साळवी, भावे साहेब, यांच्यासह बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. नरेंद्र जाधव यांच्या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे