कोरोना महामारीच्या काळात एमआरएनए लस विकसित करणारे वैज्ञानिक कॅटेलिन कारिको आणि ड्र्यू विजमन यांना यावर्षीचा औषधशास्त्रातील नोबेल पुरस्कार सोमवारी जाहीर करण्यात आला. या कोरोना लसीच्या माध्यमातून या वैज्ञानिकांनी जगाची विचारसरणी बदलली होती. यामुळे जगभरातील वैज्ञानिकांना शरीरात होणार्या इम्यून प्रक्रियेतील क्रिया -प्रतिक्रियांना अधिक सुलभपणे समजणे शक्य झाले होते. तसेच ही लस शरीरातील रोगप्रतिकारशक्ती कशी वाढविते, हे देखील सिद्ध केले होते, असे नोबेल पुरस्कार समितीने आपल्या निवेदनात नमूद केले.
हे तंत्रज्ञान कोव्हिड साथीच्याआधी प्रायोगिक पातळीवर होते. पण ते आता जगभरातील करोडो लोकांच्या उपयोगी येत आहे. कोविड-19 विरुद्ध प्रभावी mRNA लसींचा विकास करणार्या न्यूक्लिओसाइड बेस मॉडिफिकेशनशी (nucleoside base modifications) संबंधित त्यांच्या शोधांसाठी हा पुरस्कार देण्यात आल्याचं नोबेल समितीने म्हटलं आहे. आधीच्या 12 महिन्यांमध्ये ज्यांनी मानवजातीसाठी अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे, अशांचा सन्मान या पुरस्काराने करण्यात येतो.
mRNA तंत्रज्ञानाच्या आधारे आता इतर आजार आणि अगदी कर्करोगावरही संशोधन केले जात आहे. रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्यासाठी मेसेंजर आरएनए (mRNA) नावाच्या अनुवांशिक कोडचा रेणू वापरतात. विषाणूचा हल्ला झाल्यानंतर प्रतिकार करण्यासाठी शरीराला तयार करण्यास ते मदत करतं.
विद्यापीठातून पीएच. डी. केली होती. त्यानंतर त्यांनी हंगेरियातील अकादमी ऑफ सायन्सेसमधून डॉक्टरेट पदवी प्राप्त केली. नंतर त्या पेन्सिलवेनिया विद्यापीठात सहायक प्राध्यापक म्हणून रुजू झाल्या. 2013 मध्ये त्या बायो-एटेक आरएन फार्मास्युटिकल कंपनीच्या वरिष्ठ उपाध्यक्ष झाल्या. 2021 मध्ये त्यांनी कोरोनावरील लसीची निर्मिती केली होती.
ड्र्यू् विजमन यांचा जन्म 1959 मध्ये झाला. त्यांनी 1987 मध्ये बोस्टन विद्यापीठातून पीएच. डी आणि एम. डी.ची पदवी घेतली नंतर हार्वर्ड वैद्यकीय महाविद्यालयात प्रशिक्षण घेतले. 1997 मध्ये त्यांनी आपली संशोधक चमू गठित केली. सध्या ते पेन इन्स्टिट्यूट ऑफ आरएनए इनोव्हेशन्स संस्थेचे संचालक आहेत.