(चिपळूण/प्रतिनिधी)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2019 मध्ये झालेल्या परीक्षेत तालुक्यातील नागावे गावातील गिरीश प्रकाश शिंदे याने यश संपादन केले असून त्याची जलसंपदा विभागात सहायक अभियंता (वर्ग 2)पदासाठी निवड झाली आहे.
गिरीश याने प्राथमिक -माध्यमिक शिक्षण अलोरे हायस्कूलमध्ये पूर्ण करत बी इ पदवीधर झाल्यानंतर व्ही जे टी आय या नामवंत महाविद्यालयातून एम tech पर्यंत शिक्षण पूर्ण केले. कॅम्पऊस मुलाखतीतून त्याना टी सी एस कंपनीत नोकरी मिळाली. ती सांभाळत या पदासाठीची परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला. एक लाख चाळीस हजार परीक्षार्थी मधून 139 रँक मिळवला. नोकरी मिळेपर्यंत आईवडिलांची मदत घेतली पण ही परीक्षा पास होऊन निवड झाल्याची अधिकृत बातमी हाती येईपर्यंत आपल्या आई वडिलांनाही याबाबत त्यांनी कळू दिले नाही. पाटबंधारे खात्यात नोकरी केलेल्या वडील प्रकाश शिंदेंना पेढा हाती देत ही गोड बातमी सांगताच आई वडीलाच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. अनेकांनी याचे अभिनंदन केले.
याप्रसंगी सरपंच प्रकाश चिपळूणकर ,भाऊ शिरकर, दिनकर पिरदनकर, सुभाष शिंदे, राहुल शिंदे, शंकर चिपळूणकर, प्रकाश वाशीटकर, दीपक चिपळूणकर, संजय सुर्वे आदी उपस्थित होते.