(रत्नागिरी)
रविवारी रत्नागिरीत “निरामय”चे योग शिबीर संपन्न झाले. या शिबिरास 50 पेक्षा जास्त साधक उपस्थित होते. निरामय योगाचे नियमित साधक सचिन पोकळे आणि विनोद देवरुखकर यांनी 107 मिनिटात 535 सूर्यनमस्कार घालून अजून सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम केला आहे. विशेष म्हणजे निरामय योगा जॉईन करण्यापूर्वी विनोद देवरुखकर यांना संधिवाताचा खूप त्रास होता. त्यांना सकाळी उठल्यावर भिंतीचा आधार घेऊन चालायला लागे, डॉक्टरांनी या आजारावर उपचार नाहीत, असे सांगितले होते, असे त्रास असणारे विनोद देवरुखकर यांनी रविवारी सलग 107 मिनिटात 535 सूर्यनमस्कार घालण्याचा विक्रम केला आहे. असे चमत्कार नियमित योगा केल्याने होतात, म्हणून लोकांनी नियमित योगा करून निरोगी जीवन जगावे असा सल्ला योग गुरू श्री स्वामी सर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी मोबा. 9028899412 या नंबरवर संपर्क साधावा