भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी आयपीएल २०२३ मधून बाहेर झाला आहे. आयपीएल सुरु होण्यापूर्वीच गुजरात टायटन्सला मोठा धक्का बसला आहे. वर्ल्डकपचा थरार संपल्यापासून मोहम्मद शमी भारतीय संघासाठी एकही सामना खेळलेला नाही. शमीच्या डाव्या पायाला दुखापत झालीय. शमीला यासाठी इंग्लंडमध्ये सर्जरी करावी लागणार आहे. बीसीसीआयच्या सूत्रांनी याविषयी पीटीआयला माहिती दिलीय.
शमी गुजरात टायटन्सचा मुख्य गोलंदाज आहे. गतवर्षी झालेल्या आयपीएलच्या २०२३ च्या हंगामात तो शमीने सर्वात जास्त विकेट्स घेतल्या होत्या. त्याने १७ सामन्यांमध्ये १८.६१ च्या सरासरीनं २८ विकेट्स घेण्याची उल्लेखनीय कामगिरी केली होती. बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितलं की, शमीच्या डाव्या पायला (घोटा) दुखापत झाल्याने तो आयपीएलमधून बाहेर पडणार आहे. शमीला सर्जरी करण्याची आवश्यकता आहे. ही सर्जरी इंग्लंडमध्ये केली जाणार आहे.
करोडो रुपये खर्चून गुजरात टाइटन्सने शमीला संघात घेतले होते. आता गुजरातला मोठा झटका बसला आहे. पीटीआयला बीबीसीआयच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे. यानुसार शमीच्या घोट्याला दुखापत झाली होती. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात लंडनला तो खास इंजेक्शन घेण्यासाठी गेला होता. तिथे त्याला तीन आठवडे हलके धावण्यास सांगितले होते. यानंतर त्याला हे इंजेक्शन देण्यात आले होते.
वर्ल्डकप २०२३ मध्ये शमीची चमकदार कामगिरी
भारतात झालेल्या क्रिकेट वर्ल्डकप २०२३ मध्ये मोहम्मद शमीने सर्वात जास्त विकेट्स घेण्याचा कारनामा केला होता. भारताच्या या वेगवान गोलंदाजाने २०२३ च्या वनडे विश्वचषकात फक्त सात सामन्यांमध्ये १०.७१ च्या सरासरीनं २४ विकेट्स घेतल्या होत्या. शमी सुरुवातीच्या चार सामन्यांमध्ये खेळला नव्हता. तरीही त्याने सर्वात जास्त विकेट्स घेण्याचा अप्रतिम कामगिरी केली.