(रत्नागिरी)
मानधन तत्त्वावरील शिक्षकांना शिक्षण सेवक म्हणून नियुक्ती मिळावी यासाठी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आमरण उपोषणास बसलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील असंख्य D.ED. B.ED पदवीधर बेरोजगार बंधू आणि भगिनींची उपोषणाच्या तिसर्या दिवशी भेट घेवून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. उपोषणकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका आहे तसेच हा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित साहेब ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवून आपल्याला न्याय मिळेपर्यंत सदैव आपल्या पाठीशी राहू याची ग्वाही दिली. यावेळी मनसे रत्नागिरी तालुकाध्यक्ष श्री रुपेश जाधव, तालुका सचिव अॅडव्होकेट श्री अभिलाष पिलणकर, विभाग अध्यक्ष श्री सोम पिलणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.