(रत्नागिरी)
रत्नागिरीतील जनतेच्या, स्थानिक तरुणांच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायम तत्पर असते. या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागात चालणाऱ्या अनेक व्यवहारांबाबत गेली अनेक महिने महाराष्ट्र नवनिर्माण सेना पाठपूरावा करत आहे. मात्र संबंधित अधिकारी योग्य ती कागदपत्र, माहिती देण्यास टाळाटाळ करीत होते. बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अधिकारीवर्ग तसेच सौ. छाया नाईक ( आधिक्षक अभियंता ) यांना याबाबत जाब विचारण्यात आला तसेच ठिय्या देवून जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी पुढील ४ दिवसात संबंधित योग्य कागदपत्र व माहिती दिली जाईल असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने देण्यात आले.
या प्रसंगी मनसेचे संपर्क अध्यक्ष द. रत्नागिरी जिल्हा श्री. मनिष पाथरे यांच्यासह तालुका अध्यक्ष श्री. रूपेश जाधव, रस्ते आस्थापना जिल्हा अध्यक्ष श्री. अजिंक्य केसरकर, मनविसे जिल्हा अध्यक्ष गुरु प्रसाद, माजी तालुका अध्यक्ष अनिरुद्ध (छोटू ) खामकर, उपतालुकाअध्यक्ष राजू पाचकुडे, अक्षय चव्हाण, अनंत शिंदे, सुनील पारकर, साहिल वीर, सौरभ गायकवाड, सोम पिलणकर, माजी शहर अध्यक्ष सतीश राणे, ऋषिकेश रसाळ, शक्ती मयेकर, अमोल साळवी,अनिल पारकर, शिल्पाताई कुंभार, तसेच अन्य महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.