( रत्नागिरी )
मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित होऊन आज रत्नागिरी तालुक्यातील गोळप जि.प गटातील कोळंबे मधील अनेक युवकांनी मनसेच्या रत्नगड या रत्नागिरी तालुका संपर्क कार्यालयात पक्षप्रवेश केला. सर्व प्रवेश करणार्या कार्यकर्त्यांचे तालुका अध्यक्ष श्री रुपेश जाधव यांनी पक्षात स्वागत केले.
येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षबांधणी मनसेने जोरदार हालचाली सुरू केल्या असून येणाऱ्या काळात असे अनेक पक्षप्रवेश तसेच संघटनात्मक बांधणीवर भर देण्यात येणार आहे.
या पक्षप्रवेश प्रसंगी मनसे तालुका अध्यक्ष श्री रुपेश जाधव,तालुका सचिव अभिलाष पिलणकर, विभाग अध्यक्ष श्री संजय आग्रे, उपविभाग अध्यक्ष श्री नितीन रायकर, सोमनाथ पिलणकर आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.