(रत्नागिरी)
श्रमिक किसान सेवा समिती संचालित लोकनेते शामरावजी पेजे कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय शिवार आंबेरे आणि मनीषा आय टी सेंटर पावस यांच्या संयुक्त विद्यमाने शासनमान्य MS-CIT सोबत DTP, TALLY, ADVANCE EXCEL असे विविध कोर्सेस श्रमिक विद्यालय शिवार आंबेरे येथे सुरू झाले आहेत.
MKCLच्या अधिकृत MS-CIT प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी किसान सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष श्री. नंदकुमार मोहिते, कनिष्ठ महाविद्यालय व श्रमिक विद्यालयाचे प्राचार्य श्री. मधुकर थुळ, मनीषा सेंटरचे संचालक श्री गोळपकर, व श्री तोडणकर, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.
आज तंत्रज्ञानाच्या युगात साक्षर होऊन विद्यार्थ्यांना आत्मविश्वासाने जगता यावे यासाठी शिक्षण संकुलाने विद्यार्थ्यांना त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांना ही एक सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली आहे. शिक्षण संकुलातील विद्यार्थी व पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन यावेळी मान्यवरांकडून करण्यात आले