(रत्नागिरी)
तालुक्यातील जयगड येथील कळझोंडी धरणात तरुणीचा बुडालेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. ऋणाली रवींद्र जोगळे (२८, रा. कळझोंडी-लोहारवाडी, रत्नागिरी) असे तरुणीचे नाव आहे. ती बुधवारपासून बेपत्ता होती, मात्र, शुक्रवारी दुपारी तिचा मृतदेह सापडला.
क्रणाली ही मानसिक आजारी होती. बुधवारी (२१ रोजी) दुपारी १२:३० वाजता घरात कोणालाही न सांगता निघून गेली होती. त्यानंतर, तिच्या नातेवाइकांकडून तिचा शोध सुरू होता. हा शोध सुरू असतानाच शुक्रवारी दुपारी १२:३० वाजण्याच्या दरम्यान तिचा मृतदेह कळझोंडी धरणाच्या भिंतीजवळ पाण्यात बुडालेल्या स्थितीत सापडला. या प्रकरणी जयगड पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ऋणाली ही कळझोंडी धरणापर्यंत कशी आली? तिने आत्महत्या केली की, हा घातपात आहे, याचा शोध जयगड पोलिस घेत आहेत.