(दापोली)
दापोली तालुक्यातील कळंबट झिमणवाडी येथून एक अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पिंकी मधु सवर (वय ३५) यांनी दापोली पोलीस स्थानकात नोंदविली आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या घरातून त्यांची अल्पवयीन मुलगी १७ जानेवारी रात्री जेवण झाल्यानंतर झोपी गेली. मात्र १८ जानेवारी रोजी सकाळी सहा वाजता मुलीच्या आईला आपली मुलगी घरात कोठेही दिसली नाही. परिसरात आजूबाजूला नातेवाईक यांच्याकडे शोधाशोध केल्यानंतरही ती न सापडल्यामुळे मुलीच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिला अज्ञाताने पळवून नेली असल्याची तक्रार मुलीच्या नातेवाईकांनी दापोली पोलीस ठाण्यात येथे केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री निर्मळ करित आहेत.