दहावी, बारावी उत्तीर्ण बौद्ध विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ उत्साहात
( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
तालुक्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, व भारतीय बौद्ध महासभा, ग्राम शाखा, तालुका शाखा, व जिल्हा शाखा, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रति वर्षाप्रमाणे बौद्ध समाजातील सन 2023-24 मध्ये दहावी,व बारावी,बोर्डाच्या परीक्षेमध्ये, तसेच पदवीधर, डिप्लोमा, डिग्री, उत्तीर्ण विद्यार्थी- विद्यार्थिनी यांचा गुणगौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
नुकताच डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन, सिव्हिल हॉस्पिटल येथे गुणगौरव समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष एल व्ही पवार यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गेली अनेक वर्ष गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा गुणगौरव डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन केला जातो, याशिवाय व्यवसायात किंवा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी पदावरती असलेल्या व्यक्तींचे मार्गदर्शन देखील विद्यार्थ्यांना लाभत असते.
सदर कार्यक्रम हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन सिव्हिल हॉस्पिटल शेजारी रत्नागिरी येथे प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी प्रमुख मार्गदर्शक अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी गावडे साहेब उपस्थित होते, त्यांनी विद्यार्थ्यांना अगदी सोप्या भाषेत उत्तमरीत्या मार्गदर्शन केले. त्याचबरोबर संस्थेचे पदाधिकारी सिद्धार्थ सावंत, बी के कांबळे, मुकुंद कांबळे, दीपक जाधव, यांनी सुद्धा शासकीय कामातले आपले अनुभव कथन करून विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन केले.
त्यानंतर विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक, शैक्षणिक साहित्य, व आर्थिक मदत मुलांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली, यावेळी संस्थेचे पदाधिकारी शिवराम कदम,संदीप पवार, प्रदीप पवार, आनंदा मोहिते,विलास पवार,सुनील पवार, अभिजीत तांबे, राजन जाधव, सुरेंद्र जाधव, संदेश पवार, दिपाली जाधव,मानसी तांबे, स्वाती कांबळे, दर्शना कांबळे, यावेळी उपस्थित होते.
संस्थेच्या स्तुत्य उपक्रमाचे पालकांकडून कौतुक
आपल्या अध्यक्षीय भाषणात अध्यक्ष एल व्ही पवार यांनी स्पर्धा परीक्षेचा, विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी जी मदत लागेल ती करण्यास संस्था तुमच्या पाठीशी भक्कम राहील असे अभिवचन देऊन गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केले. संस्थेच्या या स्तुत्य उपक्रमाचे विद्यार्थी व पालकांनी कौतुक केले. या सत्कार समारंभासाठी अनेक विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक जाधव व आभार प्रदर्शन बी के कांबळे यांनी केले.