(देवरूख / सुरेश सप्रे)
देवरूख परिसरातील माऊली- बालाजी ग्रूप यांच्या वतीने कोकणात प्रथमच आयोजित केलेल्या या भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीचा थरार तालुक्यातील बैलगाड्या शर्यतप्रेमींनी अनुभवला. राजकारण विरहित या माऊली-बालाजी गृपने राजस्तरीय स्पर्धेचे निटनेटके आयोजन करून आपले वेगळेपण दाखविले ही कौतुकास्पद बाब आहे. भविष्यात असेच काम करून मंडळाचे नाव राज्यस्तरावर चमकेल असा विश्वास आम शेखर निकम यांनी व्यक्त केला.
या शर्यती साडवली येथिल वाघजाई मंदीराजवळील भव्य धावपट्टी वर खेळवण्यात आल्या. एकाच वेळी पाच बैलगाड्या पळविण्यात आल्या. स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक किरण सामंत, आम. शेखर निकम यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी बारक्याशेठ बने, मंडळाचे अध्यक्ष प्रसन्न सार्दळ, संदिप सुर्वे सुदेश मयेकर, साडवली सरपंच संतोष जाधव, राजू जाधव, बाळशेठ मांगले, पपू नाखरेकर, साडवली पो. पाटील सौ. डोंगर याचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
तालुक्यातील बैलगाड्या शर्यतप्रेमींसाठी ही राज्यस्तरीय स्पर्धा प्रममच आयोजित केली. ही स्पर्धा शर्यतप्रेमींसाठी आगळी वेगळी मेजवानी ठरली. तालुक्यातील बेलगाडी प्रेमींनीसह आबाल वृद्ध व महिलांनी मैदानावर तुफान गर्दी केली होती. या स्पर्धेत राज्यातील नामवंत ९० बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेतील विजेत्यांना लाखांची बक्षीसे व चषक अशी पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
Follow us on Google News : https://news.google.com/s/CBIw9dzq7KQB?sceid=IN:en&sceid=IN:en&sceid=IN:en&r=0&oc=1