(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समिती व महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन शिवाजीनगर रत्नागिरी येथे त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची १२७ वी जयंती साजरी करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला आयु. सेजल शाम तांबे , आयु. भाग्यश्री रतिलाल पावरा हे वक्ते त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांचे जीवन कार्य याविषयी प्रभावीपणे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाला रत्नागिरी तालुका बौद्धजन पंचायत समितीचे धडाडीचे व उपक्रमशील अध्यक्ष आयु. प्रकाश रामचंद्र पवार, उपाध्यक्ष विजय आयरे, चिटणीस सुहास कांबळे, सहचिटणीस शशिकांत कांबळे, खजिनदार मंगेश सावंत, त्याचबरोबर उपसमिती पदाधिकारी व सदस्य, महिला कार्यकारिणी पदाधिकारी सदस्य तसेच गाव शाखेतील महिला व पुरुष सभासद यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बौद्धजन पंचायत समितीचे अध्यक्ष आयु. प्रकाश रा. पवार, सरचिटणीस सुहास कांबळे यांनी केले आहे.