( रत्नागिरी/ प्रतिनिधी )
दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तालुका जिल्हा शाखा रत्नागिरी यांच्या विद्यमाने माता रमाई आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जयंती महोत्सव शुक्रवारी दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन ( सिव्हिल हॉस्पिटल शेजारी ) येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान स्मिताताई कांबळे यांनी भूषविले. सुरुवातीला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महिलांनी अभिवादन केले.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून मा. राहुल गायकवाड ( उपजिल्हाधिकारी रत्नागिरी ), स्वप्नाली रोहित जाधव, एल. व्ही. पवार, दिपक जाधव, बी. के. कांबळे, शिवराम कदम, भरत सावंत, संतोष कांबळे, यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले. उपस्थित महिला भगिनी यांनी माता रमाई यांच्या जीवनावर गौरव गीते गावून अभिवादन केले. एका चिमुकलीने क्रांतिज्योती सावित्री बाई फुले साक्षात जिवंत केल्या. तसेच दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया रत्नागिरी महिला विभागाच्या वतीने उपस्थित महिलांना भेट वस्तू देऊन सन्मानीत करण्यात आले.
![रत्नागिरी येथे माता रमाई व सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात 8 कार्यक्रमाला महिलांचा लक्षणीय सहभाग](https://ratnagiri24news.com/wp-content/uploads/2025/02/IMG-20250207-WA03441-300x225.jpg)
![रत्नागिरी येथे माता रमाई व सावित्रीमाई फुले जयंती उत्साहात 8 कार्यक्रमाला महिलांचा लक्षणीय सहभाग](https://ratnagiri24news.com/wp-content/uploads/2025/02/IMG-20250207-WA03441-300x225.jpg)
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्योती सावंत यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता स्मिताताई कांबळे, दिपाली जाधव, अवंतिका कांबळे, मानसी तांबे, अस्मिता कांबळे, निलीमा जाधव, विनया जाधव, स्वाती कांबळे, अर्चना पवार, आयु. अंजिरा आयरे, दर्शना कांबळे, भारती पवार, सपना पवार, प्राची जाधव आणि सर्व गाव शाखा व पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.