(रत्नागिरी)
शहरातील थिबा पॅलेस येथील विवाहिता औषधे आणण्यासाठी घरातून बाहेर पडली. ती परत आली नाही. ही घटना गुरुवारी ८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास थिबापॅलेस येथे घडली. या प्रकरणी तिच्या पतीने शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
राखीया साहिद शेख (३०, रा. सुरभी अपार्टमेंट, थिबापॅलेस, रत्नागिरी) असे घरातून निघून गेलेल्या विवाहितेचे नाव आहे. राखीया ही किरकोळ आजारी होती. ती औषधे आणण्यासाठी घरातून गेली होती. बराच वेळ झाला तरीही ती परत आली नाही. म्हणून तिच्या पतीने तिचा शोध घेतला असता तिचा कोठेही पत्ता लागला नाही. म्हणून तिच्या पतीने तातडीने शहर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.