(खेड)
शहरातील महात्मा फुले नगर येथील ४९ वर्षीय ज्योती सचिन बर्वे या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी दुपारी घडली. या घटनेची माहिती गौरी अमर चव्हाण (रा. भवानी पेठ हरकानगर, पुणे) यांनी खेड पोलिस स्थानकात दिली.
शनिवारी दुपारी हा प्रकार उघड झाला. प्राथमिक माहितीमध्ये या महिलेच्या आत्महत्येचे कारण अद्याप कळलेले नाही. याप्रकरणी खेड पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली असून, अधिक तपास खेड पोलिस करत आहेत. अलिकडे आत्महत्यांचे प्रमाण वाढत असल्याने पोलिसांनीही याबाबत चिंता व्यक्त केली आहे.