(राजापूर / प्रतिनिधी)
मराठा समाजामध्ये जेवढे शौर्य आहे तेवढ्यात मोठ्या प्रमाणात संयम देखील आहे हे समाज बांधवांनी वेळोवेळी दाखवून दिले आहे. आज पर्यंत मराठे हे इतरांना देण्याच्या भूमिकेतच होते आणि आहेत . मात्र बदलत्या परिस्थितीनुसार आणि इतरांना मिळालेल्या आरक्षण सवलतीमुळे आपल्या समाजातील हुशार आणि कर्तुत्ववान युवक, युवती विद्यार्थी मागे पडत असल्याने आरक्षणाची सवलत आपल्या समाजाला ही मिळालीच पाहिजे असे प्रतिपादन मराठा समाज सेवा संघाचे प्रभारी अध्यक्ष प्रकाश पवार यानी केले.
मराठा समाज सेवा संघ, राजापूरच्या केळवली विभागाचा मराठा मेळावा केळवली येथील श्री गगणगिरी सेवा आश्रमाच्या सभागृहात रविवार दिनांक ४ फेब्रूवारी २०२४ रोजी पार पाडला. यावेळी केळवली विभागातील मराठा बांधव मोठ्या संख्येने हजर होते. ज्यांच्या नोंदी कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी म्हणून आहेत सरसकट आरक्षण मिळाल्यास त्याचा नक्की लाभ घ्यावा. मात्र कोकणातील बहुसंख्य समाज बांधवांना ज्याप्रमाणे हिंदू मराठा म्हणून आरक्षण हवे आहे त्याचप्रमाणे तालुक्यातील समाज बांधवांना ही हिंदू मराठा म्हणूनच आरक्षण मिळाले पाहिजे असा निर्धार राजापूर तालुका मराठा सेवा संघाच्या केळवली विभागाच्या बैठकीत करण्यात आला.
तालुक्यातील समाज बांधवांच्या आणि युवा वर्गाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि संघटित करण्यासाठी राजापूर तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत आहे. पहिला मेळावा पाचल भागात पार पडला होता तर दुसरा मेळावा केळवली विभागात परमपूज्य गगनगिरी महाराज सेवाश्रमाच्या सभागृहात संपन्न झाला. प्रकाश पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या मेळाव्यात व्यासपीठावर केळवली सरपंच सौ. चव्हाण ,ॲड राहुल राणे, ॲड . गुरुदत्त खानविलकर, ॲड . सुशांत पवार, मराठा समाज सेवा संघाचे खजिनदार प्रशांत पवार, माजी पंचायत समिती सदस्य एकनाथ लाड, राजापूरचे माजी उपनगराध्यक्ष संजय ओगले, भरत लाड, पत्रकार विनोद पवार, पत्रकार राजन लाड, उपाध्यक्ष विनायक सावंत, पाचल विभागातून रविंद्र सुर्वे, उमेश दळवी, बाजीराव विश्वासराव, विनोद पवार , संजय सावंत, माजी सैनिक दीपक लाड, बाळकृष्ण सावंत, सुनील पोटले, अनंत सावंत, प्रफुल्ल सावंत, प्रमोद सावंत, मनोहर पवार, दीपक पवार, विनायक पवार, जनार्दन पवार, मंगेश चव्हाण , बाबू तावडे, उदय तावडे, बबनराव पवार आदींसह मान्यवर उपस्थित होते.
मराठा समाज बांधवांना संघटित करण्यासाठी आणि समाजबांधवांच्या सर्वांगीण उन्नतीसाठी शासनाच्या विविध योजनांच्या लाभासह एकमेकांना सहाय करण्यासाठी समाज बांधवांमधील पत्रकार, वकील डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकारणात सक्रिय असलेल्या अनेकांनी तयारी दर्शवली असून त्या सर्वांच्या सहकार्याने एकत्रितपणे आपल्या समाज बांधवांचा विकास साधूया असा निर्धार ही या सभेमध्ये करण्यात आला.
या सभेमध्ये ॲड. राहुल राणे, ॲड. गुरुदत्त खानविलकर, ॲड. सुशांत पवार, पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते राजन लाड, पत्रकार उमेश दळवी, माजी सैनिक दीपक लाड आदींनी मार्गदर्शन केले. याचवेळी केळवली विभागातील अनेकांची सदस्य नोंदणी ही करण्यात आली. बांधवांच्या या केळवली विभागातील मेळाव्याला परिसरातील बहुसंख्य समाज बांधवांनी उपस्थिती लावली होती. याचवेळी केळवली विभागाची कमिटी स्थापन करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार विनोद पवार यांनी केले.