(मुंबई)
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील चांगलेच आक्रमक झाले आहेत. जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत, तसंच फडणवीसांच्या सागर बंगल्यावर जाण्यासाठी आपण अंतरवाली सराटीहून निघत असल्याचा इशारा जरांगेकडून देण्यात आलाय. उपचार घेऊन योग्य निर्णय घेण्याची विनंती पोलीस जरांगेंना करत आहेत, मात्र उपचार घेणार नाही, सागर बंगल्यावर जाणार, या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत.