(संगमेश्वर / एजाज पटेल)
हिरवी मिरची, नरसाळे, झगा, पॅण्ट, फणस, फ्लॉवर, कोल्हापुरी पायताण, उड्या मारण्याची दोरी, कॉम, स्वीच बोर्ड, लोकर व सुई, पक्कड, ड्रील मशीन ही घरातील साहित्याची यादी वाटत असेल तर जरा थांबा. या दैनंदिन गरजेच्या वस्तू कितीही महाग झाल्या असल्या तरी निवडणूक आयोगाने मात्र विधानसभा निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारांवर मतदान चिन्ह स्वरुपात मुक्तहस्ताने त्यांची उधळण केली आहे. यातील काही चिन्हे पारंपरिक, काही बदलत्या काळाला अनुसरून तर काही अगदीच मजेशीर, अशीच आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर झाल्यावर निवडणूक विभागाने मतदारसंघांसाठी अर्ज भरण्यात येणाऱ्या कार्यालयांबाहेर राष्ट्रीय पक्षांचे राखीव चिन्ह व अपक्ष उमेदवारांसाठीच्या मुक्तचिन्हांची मोठी यादीच लावली आहे. यातील बरीचशीचिन्हे मजेशीर आहेत. काही चिन्हे अशी आहेत की, ती मिळणाऱ्या उमेदवाराची प्रचार करताना कसरत होणार आहे.अनेक जण त्या ठिकाणी थांबून उत्सुकतेने पाहताना दिसतात. तसेच त्यावर चर्चाही करताना दिसत आहेत.
चिन्ह या प्रमाणे आहेत
फळे व भाज्या: सफरचंद, फणस, अक्रोड, कलिंगड, फ्लॉवर, सिमला मिरची, हिरवी मिरची, फळांची टोपली, मटर, भुईमूग, केक,द्राक्षे, चॉकलेट, आले, भेंडी, पाव.
दागिने, कपडे कानातील, नेकलेस, बांगड्या, अंगठी, कोट, बूट, कोल्हापुरी चप्पल, बेल्ट आदी
अन्य साहित्य: दाढी करण्याचे ब्लेड, पन्चिंग मशीन, स्वीच बोर्ड, खिडकी, कपडे
अडकविण्यासाठी भिंतीची पट्टी, स्कूल बॅग, उशी, किचनमधील सिंक, करवत, हातगाडी.
विटा, खाट. घरातील साहित्य कचरापेटी, जेवणाचा डबा, सेफ्टी पिन, नेल कटर, टूथपेस्ट, ब्रश, कात्री, पेट्रोलपंप, पाणी गरम करायचे रॉड, लायटर, कडी, पेन स्टॅण्ड, टाय, नुडल्सचे वाडगे, दरवाजाची कडी, फ्रीज, टीव्ही, लॅपटॉप, मशीन, जातं, पोळपाट-लाटणं, टोस्टर, वॉशिंग मशीन आदी निवडणूक चिन्हे उमेदवारांना मिळणार आहेत.