(कळझोंडी / किशोर पवार)
रत्नागिरी तालुक्यातील कळझोंडी फाटा क्रमांक २ येथे विद्युत तारांच्या घर्षणामुळे वणवा भडकला व याचा जोरदार फटका आंबा उद्योजक व प्रगतशील शेतकरी मदन अनंत मुळ्ये यांना बसला असून त्यांची ५० कलमे असलेल्या बागेत मोठ्या प्रमाणात आग लागून सुमारे ४० कलमे होरपळून निघाली आहे. असून सुमारे दोन लाखाचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच नजीकच असलेल्या आत्माराम अगोंडे यांच्या बागेतही आग घुसली व त्यांची काजूची झाडे व कलमे होरपळून गेली असल्याने त्यांचेही सुमारे लाखो रुपयाचे नुकसान झाल्याचा अंदाज दिसून आला आहे.
याबाबतचे वृत्त असे की दिनांक १९ रोजी भर दुपारी १२:३० च्या दरम्याने कळझोंडी फाटा क्रमांक २ येथे विद्युत पोलवरून शॉर्ट सर्किट झाल्याने ठिणगी पडली या ठिणगीचे रूपांतर भल्यामोठ्या वणव्यात झाले कळझोंडी फाटा क्रमांक २ ते आर के मुळ्ये स्टॉप व कळझोंडी फाटा क्रमांक २ ते लोहारवाडी मार्गाकडे जाणाऱ्या जमीन कातळ भागातून आगीने मोठे तांडव उभे केले. हाहा म्हणता परिसरात वणवा गेल्याची बातमी पसरताच शेजारी असलेले उद्योजक मुन्ना मयेकर यांचे कामगार तसेच आंबा बागायतदार प्रकाश पवार व त्यांचे बागेतील कामगार त्याचबरोबर नामवंत उद्योजक मदन शेठ मुळ्ये यांचे बागेतील कामगार तसेच तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संदीप पवार त्याचबरोबर जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेचे पर्यवेक्षक दत्ताराम निंबरे सहकारी कर्मचारी सहदेव वीर अमोल निंबरे यांनी आपापल्या परीने आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. परंतु आग आटोक्यात येत नव्हती सदरची माहिती जयगड पोलीस ठाणे येथील उपनिरीक्षक श्री साळवी यांनी याबाबत माहिती घेतली व जिंदाल कंपनीचा अग्निशामक दलाला पाचारण केले. थोड्या वेळात जिंदाल कंपनीचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. व रस्त्यालगत असलेली आग विजवण्यासाठी प्रयत्न केले. साधारणतः दुपारी २ ते ४ या वेळेत फार मोठी कसरत करावी लागली या घटनेची माहिती उपसरपंच प्रकाश पवार यांना मिळतात ते आपल्या कामगारांसह घटनास्थळी दाखल झाले.
सदर घटनेचा पंचनामा करण्यासाठी कळझोंडी गावचे तलाठी स्नेहल लोंढे, सरपंच दीप्ती वीर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष संदीप पवार, दीपक वीर, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार किशोर पवार, कृषी सहाय्यक यांनी घटनास्थळी भेट देऊन संपूर्ण जागेची पाहणी केली व पंच यादी घालून पंचनामा करण्यात आला प्रगतशील शेतकरी मदन मुळ्ये यांनी मुलांप्रमाणे अतिशय मेहनत घेऊन सांभाळलेली कलमांची बाग वणव्यामध्ये होरपळून गेल्याने त्यांच्या मनाला फार मोठे वेदना झाली आहे. गेली ४ वर्षे सातत्याने या भागात फेब्रुवारी, मार्च यादरम्याने विद्युत घर्शनाने घर्षणाने भले मोठे वणवे जात आहेत. याबाबत वीज वितरण कंपनीने येथील पोलवर लक्ष ठेवून असे अनुचित प्रकार घडू नये म्हणून खबरदारी घ्यावी अशा प्रतिक्रिया गावातील नागरिकांनी व्यक्त केले आहेत.
तरी कळझोंडी गावातील आंबा व्यावसायिक श्रीयुत मदन मुळ्ये व आत्माराम अगोंडे यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी अशी आग्रही मागणी कळझोंडी गावातून होत आहे.